शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

तांत्रिक अडचणींमध्ये अडकली तीन गावांची पाणीपुरवठा योजना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 14:58 IST

जऊळका रेल्वे (वाशिम) : जऊळका रेल्वेसह उडी आणि वरदरी बु. या तीन गावांकरिता साधारणत: १८ वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेली पाणीपुरवठा योजना अद्याप पूर्ण ताकदीने कार्यान्वित होऊ शकली नाही.

ठळक मुद्दे १८ वर्षांपूर्वी जऊळका रेल्वे, उडी, वरदरी बु. या तीन गावांना पाणी पुरवठा व्हावा, यासाठी जऊळका रेल्वे येथे जलकुंभ आणि जलशुद्धीकरण यंत्रणा उभारण्यात आली. तीन गावांमधील नागरिकांना पाणीपुरवठा केला जाणार होता; परंतू तांत्रिक अडचणींमध्ये योजना फसल्याने ही बाब अद्याप शक्य होऊ शकली नाही. दरवर्षी लाखो रुपये खर्च करुन थातूर- मातूर योजना चालू करुन पाणीपुरवठा योजना सुरु असल्याचा केवळ देखावा केल्या जात आहे.  

जऊळका रेल्वे (वाशिम) : जऊळका रेल्वेसह उडी आणि वरदरी बु. या तीन गावांकरिता साधारणत: १८ वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेली पाणीपुरवठा योजना अद्याप पूर्ण ताकदीने कार्यान्वित होऊ शकली नाही. जलशुद्धीकरणाच्या इमारतीची रंगरंगोटी करण्याव्यतिरिक्त इतर कुठलीही कामे मार्गी लागू शकली नाहीत. यामुळे परिसरातील शेकडो ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.महाराष्टÑ जीवन प्राधिकरण योजनेअतर्गंत १८ वर्षांपूर्वी जऊळका रेल्वे, उडी, वरदरी बु. या तीन गावांना पाणी पुरवठा व्हावा, यासाठी जऊळका रेल्वे येथे जलकुंभ आणि जलशुद्धीकरण यंत्रणा उभारण्यात आली. मात्र, याअंतर्गत अद्याप पाणीपुरवठा झालेला नाही. जऊळका गावालगत काटेपूर्णा नदिवर चाकातिर्थ प्रकल्पाची निर्मीती झाली. तेथूनच तीन गावांमधील नागरिकांना पाणीपुरवठा केला जाणार होता; परंतू तांत्रिक अडचणींमध्ये योजना फसल्याने ही बाब अद्याप शक्य होऊ शकली नाही. दरवर्षी लाखो रुपये खर्च करुन थातूर- मातूर योजना चालू करुन पाणीपुरवठा योजना सुरु असल्याचा केवळ देखावा केल्या जात आहे.  जऊळकानजिक असलेल्या प्रकल्पाचाही ग्रामस्थांना कुठलाच फायदा होत नाही. तसेच शेतीला सिंचन करण्याची शेतकºयांची इच्छा आहे; पण रेल्वे लाईन गेल्यामुळे पाईपलाईन घेण्यासाठी परवानगी काढण्यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागणार आहेत. एकूणच या सर्व अडचणींमुळ जऊळका रेल्वे, उडी आणि वरदरी बु. या तीन गावांमधील ग्रामस्थांना दरवर्षीप्रमाणे यंदाही भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत असल्याचे दिसून येत आहे. 

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी