शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
2
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
5
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
6
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
7
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
8
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
9
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
10
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
11
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
12
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
13
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
14
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
15
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
16
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
17
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
18
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
19
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
20
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना

बिबखेडची पाणीपुरवठा योजना थंडबस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 18:35 IST

रिसोड (वाशिम : सन २०१८-१९ मध्ये स्मार्ट ग्राम ठरलेल्या बिबखेडा येथील नागरिकांची पाण्यासाठी पायपिट सुरू आहे.

- विवेकानंद ठाकरे  रिसोड (वाशिम : सन २०१८-१९ मध्ये स्मार्ट ग्राम ठरलेल्या बिबखेडा येथील नागरिकांची पाण्यासाठी पायपिट सुरू आहे. आठ वर्षांपासून येथील पाणीपुरवठा योजना थंडबस्त्यात असल्याने याचा जबर फटका नागरिकांना बसत आहे. बिबखेडा हे पुनर्वसित असून, येथील पाणीपुरवठा योजना कार्यान्वीत करण्याची जबाबदारी ही लघु पाटबंधारे विभाग वाशिम यांच्यावर आहे. आठ वर्षापुर्वी बिबखेडा येथे जलकुंभाचे काम अर्धवट करण्यात आले आहे. तेव्हापासून सदर काम जैसे थे आहे. पाणीपुरवठाकरिता पाईपलाईनच्या कामाचे तीनतेरा वाजले आहे. तेथील पाणीपुरवठा योजनेचे काम व्यवस्थित झाले नाही. पाणीपुरवठा योजना कार्यान्वीत नसल्यामुळे ग्रामस्थांना दोन किलोमीटर अंतरावर पायपिट करून पाण्याची व्यवस्था करावी लागत आहे. बहुतांश ग्रामस्थांकडे बोअरवेलची व्यवस्था आहे. जलपातळीत घट झाल्याने बोअर कोरड्या पडल्या आहेत. काही मोजक्याच बोअरला पाणी आहे.  गावात टँकरने पाणीपुरवठा होत आहे. मात्र, संपूर्ण गावकºयांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसल्याने गावकºयांची पाण्यासाठी पायपिट सुरू आहे. काही जण गावातील जलस्त्रोतावरून तर काही जणांना शेतातून बैलबंडीव्दारे पाण्याची व्यवस्था करावी लागत आहे. आठ वर्षापासून पाण्याची टाकी शोभेची वस्तू बनली आहे. पाणीपुरवठा योजनेचा निधी सुद्धा काढण्यात आला आहे. पण प्रत्यक्षात मात्र गावकºयांना पाण्याचा थेंब सुद्धा या योजनेमधून मिळाला नाही हे विशेष. याप्रकरणी सविस्तर चौकशी झाल्यास मोठे घबाड समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. बिबखेडा पाणीपुरवठा योजनेसंदर्भात संबंधित कंत्राटदारास नोटीस बजावण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर पुढील दिशा ठरणार आहे.- शिवाजी जाधव कार्यकारी अभियंता, लघू पाटबंधारे विभाग वाशिम

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोड