शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

‘मडाण’ नदीचे खोलीकरण मिटविणार १३ गावांची पाणी समस्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 17:42 IST

मंगरुळपीर (वाशिम) : राज्य शासन आणि बीजेएसच्या सामंजस्य करारातून सुरू असलेल्या सुजलाम, सुफलाम, अभियानांतर्गत मंगरुळपीर तालुक्यातील मानोली येथील मडाण नदीचेही खोलीकरण करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर (वाशिम) : राज्य शासन आणि बीजेएसच्या सामंजस्य करारातून सुरू असलेल्या सुजलाम, सुफलाम, अभियानांतर्गत मंगरुळपीर तालुक्यातील मानोली येथील मडाण नदीचेही खोलीकरण करण्यात येणार आहे. या नदीच्या खोलीकरणामुळे १३ गावांतील पाणीसमस्या कायमची हद्दपार होणार असून, नदीच्या खोलीकरणापूर्वी सिंचन विभागाच्या सहकार्याने करण्यात येत असलेले उपनाल्यांचे खोलीकरण आता अंतिम टप्प्यात आले आहे.   मंगरुळपीर तालुक्यातील मानोली येथील मडाण नदी गेल्या अनेक वर्षांपासून गाळ उपसा न झाल्याने बुजल्यात जमा आहे. कधीकाळी या नदीच्या भरवशावर परिसरातील १३ गावांत सिंचन शेती केल्या जात होती, याच नदीच्या भरवशावर मासेमारी व्यवसायही भरभराटीस आला होता; परंतु कालाओघात या नदीकडे प्रशासन आणि ग्रामपंचायतींचे दुर्लक्ष झाल्याने ही नदी बुजत गेली. या नदीपात्रात मोठमोठी झाडेही वाढली. सतत जमा होणाºया गाळामुळे नदीचे पात्र उथळ आणि अरूंद झाले. त्यामुळे १२६०० मीटर लांबीच्या या नदीवर अवलंबून असलेल्या १३ गावांत पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. या नदीचे खोलीकरण सुजलाम, सुफलाम, अभियानातून होत असून, त्यापूर्वी नदीच्या उपनाल्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात येत आहे. तब्बल १५०० मीटर लांबीच्या या नाल्याचे खोलीकरण अंतिम टप्प्यात आले असून, या कामामुळे परिसरातील पाणीसमस्या कायम हद्दपार होईलच शिवाय सिंचनाच्या क्षेत्रातही लक्षणीय वाढ होणार आहे. केंद्रीय जलसंधारण मंत्री नितिन गडकरी यांनी या नदीच्या खोलीकरणासाठी पुढाकार घेत शासनाकडे शिफारसही केली होती, हे येथे उल्लेखनीय.

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीरriverनदी