शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

लघू प्रकल्पांच्या पातळीत झपाट्याने घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 16:30 IST

आसेगाव (वाशिम): पावसाळा उलटून दोन महिनेही होत नाही, तोच आसेगाव परिसरातील लघू प्रकल्पांच्या पातळीत झपाट्याने घट होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क आसेगाव (वाशिम): पावसाळा उलटून दोन महिनेही होत नाही, तोच आसेगाव परिसरातील लघू प्रकल्पांच्या पातळीत झपाट्याने घट होत आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त असून, रब्बी हंगामातील गहू पिकालाही पुढे सिंचनासाठी पाणी मिळणार की नाही, अशी भिती यामुळे निर्माण झाली आहे.गतवर्षीच्या तुलनेत यंदा चांगला पाऊस पडल्याने आसेगाव परिसरातील प्रकल्प शंभर टक्के भरले होते. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण होते. प्रकल्प काठोकाठ भरल्याने शेतकºयांनी रब्बी हंगामाची पेरणी झपाट्याने उरकली. यंदा या परिसरात गतवर्षीच्या तुलनेत रब्बीच्या क्षेत्रात मोठी वाढली झाली. तथापि, पावसाळा संपून दोन महिने होत नाही तोच परिसरातील प्रकल्पांची पातळी झपाट्याने खालावत चालली आहे. आसेगाव परिसरातील आसेगाव बांध, तसेच सार्सी, चिंचखेड, पिंपळगाव, नांदगाव येथील लघू प्रकल्पात सद्यस्थितीत ६० टक्क्यांच्या जवळपास जलसाठा शिल्लक आहे. प्रकल्पांच्या पातळीत झपाट्याने होत असलेली घट पाहता. रब्बी हंगामातील गहू पिकाच्या सिंचनासाठी पुढे पाणी मिळेल की नाही, अशी भिती शेतकºयांना वाटू लागली आहे. या प्रकल्पांच्या भरवशावरच शेकडो शेतकºयांनी हरभरा, गहू पिकाची पेरणी केली आहे. आता प्रकल्पात होणारी घट पाहता यंदाच्या उन्हाळ्यातही पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

टॅग्स :washimवाशिमDamधरण