शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील ७५ प्रकल्पांची पाणीपातळी शून्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 17:25 IST

वाशिम : एकीकडे उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चाललेला असताना दुसरीकडे जिल्ह्यातील लघु आणि मध्यम अशा १३१ प्रकल्पांमध्ये आजरोजी केवळ ११ टक्क्याच्या आसपास पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे.

ठळक मुद्दे१३१ प्रकल्पांमध्ये सद्या ११ टक्क्याच्या आसपासच पाणीसाठा शिल्लक.शून्य ते १० टक्के पाणीसाठा शिल्लक असलेले १५ प्रकल्प आहेत. ५० ते ७५ टक्क्यांपर्यंत पाणीसाठा असणारे केवळ ३ प्रकल्प आहेत. 

वाशिम : एकीकडे उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चाललेला असताना दुसरीकडे जिल्ह्यातील लघु आणि मध्यम अशा १३१ प्रकल्पांमध्ये आजरोजी केवळ ११ टक्क्याच्या आसपास पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे. त्यातही गंभीर बाब म्हणजे ७५ प्रकल्पांची पाणीपातळी शून्यावर पोहचली असून ग्रामीण भागातील हातपंप, कुपनलिका यासह इतर जलस्त्रोतही कोरडे पडण्याच्या मार्गावर असल्याने शेकडो गावे पाणीटंचाईच्या सावटाखाली आली आहेत. दरम्यान, या बिकट परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून ठोस उपाययोजना राबविण्याची गरज निर्माण झाली असून त्याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष पुरवावे, अशी मागणी जोर धरत आहे. जलसंपदा विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील तीन मध्यम आणि १२८ लघु अशा १३१ प्रकल्पांमध्ये सद्या ११ टक्क्याच्या आसपासच पाणीसाठा शिल्लक राहिलेला असून तब्बल ७५ प्रकल्पांची पाणीपातळी शून्यावर पोहचली आहे. शून्य ते १० टक्के पाणीसाठा शिल्लक असलेले १५ प्रकल्प आहेत. १० ते २५ टक्के पाणीसाठा शिल्लक असलेल्या १९ प्रकल्पांचा समावेश असून ५० ते ७५ टक्क्यांपर्यंत पाणीसाठा असणारे केवळ ३ प्रकल्प आहेत. तथापि, प्रकल्पांमधील पाणीसाठ्यासंदर्भात उद्भवलेल्या या विदारक परिस्थितीमुळे जिल्ह्यातील शेकडो गावे पाणीटंचाईच्या संकटात सापडली आहेत. त्यावर मात करण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून ठोस अंमलबजावणीची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी