शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वॉटर कप स्पर्धा :  कारंजा तालुक्यातील आठ गावातील श्रमदान कामाची प्रकल्प संचालकांकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 17:30 IST

कारंजा लाड : शेतीच्या विकासासाठी गाव पातळीवर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाकरीता कारंजा तालुक्यातील आठ गावाची निवड करण्यात आली. या गावाचा आढावा घेण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक विकासचंद्र रस्तोगी यांनी  पाहणी केली. रस्तोगी कारंजा दौºयावर आले होते. दरम्यान मुख्यमंत्री कार्यालयाकडून त्यांना भ्रमनध्वनीव्दारे सुचना देण्यात आली की, या प्रकल्पाकरीता ...

ठळक मुद्दे गावाचा आढावा घेण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक विकासचंद्र रस्तोगी यांनी  पाहणी केली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून दिली आठ गावांना भेट.

कारंजा लाड : शेतीच्या विकासासाठी गाव पातळीवर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाकरीता कारंजा तालुक्यातील आठ गावाची निवड करण्यात आली. या गावाचा आढावा घेण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक विकासचंद्र रस्तोगी यांनी  पाहणी केली.

 रस्तोगी कारंजा दौºयावर आले होते. दरम्यान मुख्यमंत्री कार्यालयाकडून त्यांना भ्रमनध्वनीव्दारे सुचना देण्यात आली की, या प्रकल्पाकरीता प्रेरणा घेता यावी याकरीता पाणी फांउडेशन कडून राबविण्यात येणाºया सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २ मध्ये कांरजा तालुक्यात प्रथम आलेल्या जयपुर गावाला भेट देउन तेथे केलेल्या कामाची पाहणी करावी. त्यानुसार प्रकल्प संचालक यांनी आपला शासकीय दौरा आटोपुन जयपुर गावाला भेट देउन श्रमदानातून केलेल्या कामाची पाहणी केली. नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प करीता कारंजा तालुक्यातील आठ गावाची निवड करण्यात आली. या गावात शेतीच्या विकासाबरोबर गाव विकास व्हावा व लोकांचे मनसंधारण व्हावे त्या दुष्टीने कृषी प्रकल्पातील गावकºयांना प्रेरणादायी, मार्गदर्शन, शिवार फेरी, जलसंधारणाची कामे आदीची माहीती होउन प्रकल्पातील लोकांनी शासनाच्या मदतीने आपल्या गावात लोकसहभाग देउन जयुपर गावासारखी कामे करावी. त्यांनी जयपुर गावाला भेट देउन सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेदरम्यान श्रमदानातून सि.सि.टी, गॅबियन, शेततळे, एल.बी.एस, माती नाला बांध, कंपारमेंट बंडींग, कंटुंर बंडीग, वॅट ही कामे तर मशिनव्दारे नाला खोलीकरण व रूंदीकरण, शेततळे आदी कामाची पाहणी केली. स्पर्धेदरम्यान राबविलेल्या विविध उपाय योजना तथा कामाचे नियोजन या बाबीची सखोल माहीती स्पर्धा राबविणारे जयपुर येथील उपसरपंच विजय काळे यांच्या कडून घेतली. व त्यांनी ठेवलेल्या सर्व नोंद पुस्तिकांची पाहणी केली. यावेळी प्रकल्प संचालक यांनी संबधित कृषी विभागाच्या सर्व अधिका-यांना जयपुर येथील कामाच्या नियोजनाचा उपयोग विजय काळे यांच्या सहकायार्ने या योजनेतील  गावात करून घेण्याच्या सुचना केल्यात. 

यावेळी प्रकल्प संचालक विकासचंद्र रस्तोगी यांच्या समवेत कृषीतज्ञ कोळेकर, शुभदा थाळी , जिल्हा अधिक्षक दत्तात्रय गावसाने, उपविभागीय कृषी अधिकारी इंगळे, तालुका कृषी अधिकारी समाधान धुळधुळे, जयपूर ग्रामपंचायतचे उपसरपंच विजय काळे, मंडळ कृषी अधिकारी भगत व घुले, ग्रामसेवक नरेश गजभिये, कृषी सहायक सोळंके, गुणवंत ढोकने, फुके याची उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिम