वॉटर कप स्पर्धा आता ७५ तालुक्यांमध्ये होणार, जलसंधारणासाठी विशेष उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 05:54 AM2017-11-23T05:54:11+5:302017-11-23T05:54:14+5:30

मुंबई : पाणी फाऊंडेशनच्या वतीने जलसंधारणासाठीची वॉटर कप स्पर्धा आता राज्यातील ७५ तालुक्यांमध्ये घेण्यात येणार असल्याची घोषणा फाऊंडेशनचे प्रमुख आणि अभिनेते आमिर खान यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत केली.

Water Cup Competition will now take place in 75 talukas, special activities for water conservation | वॉटर कप स्पर्धा आता ७५ तालुक्यांमध्ये होणार, जलसंधारणासाठी विशेष उपक्रम

वॉटर कप स्पर्धा आता ७५ तालुक्यांमध्ये होणार, जलसंधारणासाठी विशेष उपक्रम

Next

मुंबई : पाणी फाऊंडेशनच्या वतीने जलसंधारणासाठीची वॉटर कप स्पर्धा आता राज्यातील ७५ तालुक्यांमध्ये घेण्यात येणार असल्याची घोषणा फाऊंडेशनचे प्रमुख आणि अभिनेते आमिर खान यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत केली.
या स्पर्धेच्या निमित्ताने दोघांनी राज्यातील जिल्हाधिकाºयांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधला. या स्पर्धेसाठी सहकार्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. २४ जिल्ह्यांमधील ७५ तालुक्यांत ही स्पर्धा होणार आहे. तीत सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांना सहभागासाठी प्रोत्साहन द्यावे, या स्पर्धेमध्ये सीसीटी, शोष खड्डे आदी नरेगातील कामांचाही समावेश करण्यात यावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या.
वॉटर कप स्पर्धेबरोबरच पाणीदार झालेल्या गावांमधील झुडपे वाढविणे, जंगलांचे संवर्धन, मृदा आरोग्य व जल व्यवस्थापन आदी चार महत्वाच्या विषयांमध्ये काम करण्यास उत्सुक असल्याचेही आमिर खान यावेळी म्हणाले. यावेळी मृद व जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी व अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Water Cup Competition will now take place in 75 talukas, special activities for water conservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.