शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मंगरूळपीर तालुक्यावर घोंगावतेय पाणीटंचाईचे संकट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 13:38 IST

मंगरूळपीर (वाशिम) : तालुक्यातील बहुतांश तलाव कोरडे पडण्याच्या मार्गावर असून विहिरी, हातपंप आणि कुपनलिका या जलस्त्रोतांची पातळीही खालावत चालल्याने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मंगरूळपीर तालुक्यावर भीषण पाणीटंचाई संकट घोंगावत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरूळपीर (वाशिम) : तालुक्यातील बहुतांश तलाव कोरडे पडण्याच्या मार्गावर असून विहिरी, हातपंप आणि कुपनलिका या जलस्त्रोतांची पातळीही खालावत चालल्याने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मंगरूळपीर तालुक्यावर भीषण पाणीटंचाई संकट घोंगावत आहे. ही बाब लक्षात घेता प्रशासनाने तातडीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करून अतीटंचाईग्रस्त गावांना टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी होत आहे.मंगरूळपीर तालुक्यात गतवर्षीच्या पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या १०२ टक्के पाऊस झाला. यामुळे नदी-नाले, तलाव तुडूंब होण्यासोबतच जलस्त्रोतांची पातळीही कमालीची वाढली होती. मात्र, जमिनीत पाणी मुरण्यास अडथळा ठरणाºया ‘बेसॉल्ट’ खडकाचे तुलनेने तालुक्यातील गावांमध्ये असलेले अधिक प्रमाण, योग्य नियोजनाचा अभाव आणि पाणी बचतीबाबत असलेल्या उदासिनतेमुळे यावर्षी पुन्हा मार्च महिन्यानंतरच अधिकांश तलाव कोरडे पडले असून अन्य जलस्त्रोतांच्या पातळीवरही परिणाम झाल्याने मंगरूळपीर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. काही गावांमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांनी मोफत पाणी पुरवठा सुरू केल्याने संबंधित गावातील ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे; परंतु बºयाच गावात हा उपक्रम राबविण्यासाठी पुरेशे पाणी उपलब्ध नाही. दरम्यान, सद्या सुरू असलेल्या एप्रिल महिन्यात पाणीटंचाई अधिक गंभीर स्वरूप धारण करणार नसली तरी आगामी मे आणि त्यानंतर जून महिन्यात ही समस्या बळावणार असल्याचे संकेत मिळत आहेत. याकडे लक्ष पुरवून प्रशासनाने पाणीटंचाईच्या संभाव्य कृती आराखड्यात केलेल्या नियोजनानुसार ठराविक विहिरींचे अधिग्रहण करून तथा अतीटंचाईग्रस्त गावांना टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरू करण्यासोबतच अन्य स्वरूपातील उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी सर्वच स्तरातून होत आहे.

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीरwater scarcityपाणी टंचाई