शहरं
Join us  
Trending Stories
1
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
2
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
3
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
4
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
5
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
6
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
7
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
8
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
9
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
10
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
11
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
12
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
13
आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
14
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
15
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
16
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई
17
भारतीय महिला संघ लॉर्ड्स वनडे जिंकण्यास सज्ज; इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना आज
18
मुंबईची सारा जामसुतकर ठरली ‘चॅम्पियन’
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

टँकरग्रस्त गावात लोकसहभागातून जलसंधारणाची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 01:31 IST

वाशिम : २0११ पर्यंत हिवाळ्यापासूनच पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार्‍या वाळकी-दोडकी या गावात २0१२ पासून लोकसहभागातून जल चळवळ सुरू झाली. २0१२ ते २0१६ या चार वर्षांत लोकसहभागातून विविध प्रकारची जलसंधारणाची कामे झाली. परिणामी, पडणारा पाऊस शिवारात थांबू लागला आणि भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली. यावर्षी पावसात सातत्य नसतानाही, दोडकी परिसरातील तलाव, नाले, विहिरींना बर्‍यापैकी पाणी असल्याने शेतकर्‍यांना खरिपाची पिके चांगल्या पद्धतीने जगविता आली.

ठळक मुद्देशेतीला मिळतेय पाणी भूगर्भातील जलपातळीत वाढ 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : २0११ पर्यंत हिवाळ्यापासूनच पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार्‍या वाळकी-दोडकी या गावात २0१२ पासून लोकसहभागातून जल चळवळ सुरू झाली. २0१२ ते २0१६ या चार वर्षांत लोकसहभागातून विविध प्रकारची जलसंधारणाची कामे झाली. परिणामी, पडणारा पाऊस शिवारात थांबू लागला आणि भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली. यावर्षी पावसात सातत्य नसतानाही, दोडकी परिसरातील तलाव, नाले, विहिरींना बर्‍यापैकी पाणी असल्याने शेतकर्‍यांना खरिपाची पिके चांगल्या पद्धतीने जगविता आली.एरव्ही हिवाळ्याला सुरुवात होत नाही, तोच दोडकी येथे दरवर्षी पाणीटंचाई जाणवत होती. पाणीटंचाईच्या दाहकतेतून गावाला बाहेर काढण्यासाठी गावकर्‍यांनी लोकसहभागातून जलसंधारणाच्या कामांची मुहूर्तमेढ रोवली. यासाठी सामाजिक कार्यकर्ते सुभाष नानवटे यांनी पुढाकार घेतला. सलग चार ते पाच वर्षे जल चळवळ राबविली. जलयुक्त शिवार अभियानातही गावाचा समावेश झाला. लोकसहभाग आणि विविध स्वयंसेवी, दानशूरांच्या मदतीतून माती बंधारे, दगडी बांध, शेततळे, नाला खोलीकरण, सिमेंट, गॅबियन, भूमिगत व वनराई बंधारे, फायबर सीट बंधारे आदी जलसंधारणाची कामे झाली. परिणामी, शिवारात पडणारा पाऊस शिवारात थांबू लागला व भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होऊ लागली. यामुळे गावकर्‍यांमध्ये जलसाक्षरता वाढली. शेतकरी कमी पाण्यात जास्त उत्पादन घेण्यासाठी मोठय़ा प्रमाणात तुषार सिंचनाचा वापर करू लागले. कमी पाण्यामध्ये जास्त सिंचन होत आहे, असे सुभाष नानवटे अभिमानाने सांगतात.यावर्षी पावसात सातत्य नसतानादेखील दोडकी परिसरातील शेतकर्‍यांनी विविध जलस्रोतांच्या आधारे सोयाबीन व अन्य पिके फुलविली असल्याचे दिसून येते. गत दोन वर्षांपासून गाव टँकरमुक्त झालेले आहे. लोकसहभागातून गावकर्‍यांनी साधलेली जलसमृद्धीची ही किमया इतरांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.

कधीकाळी गावाला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. लोकसहभागातून व संपूर्ण गावकर्‍यांच्या एकजुटीतून विविध प्रकारची जलसंधारणाची कामे करण्यात आली. परिणामी, आता गाव टँकरमुक्त तर झाले आहेच; शिवाय पावसाने दडी दिलेली असतानाही विविध प्रकारच्या जलस्रोतांच्या माध्यमातून पिकांना सिंचन करणे शक्य झाले. जलपातळीत वाढ झाल्याने अन्य गावांच्या तुलनेत दोडकीतील पीक परिस्थिती बर्‍यापैकी असल्याचे थोडेफार समाधान आहे.- सुभाष नानवटे, ग्रामस्थ, दोडकी.