शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील ९२ प्रकल्पातील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 19:06 IST

भविष्यात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याने वाशिम जिल्ह्यातील ९२ प्रकल्पात सध्या उपलब्ध असलेले पाणी पिण्याव्यतिरिक्त इतर अन्य प्रयोजनासाठी वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. याकरिता प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.

ठळक मुद्दे१८ जानेवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश इतर प्रयोजनासाठी उपसा करण्यास मनाई   

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात  २० आॅक्टोंबर २०१७ पर्यंत ८४.२२ टक्के पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्पात १८ नोव्हेंबर पर्यंतच्या आकडेवारीनुसार सरासरी २६.७२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. भविष्यात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यातील ९२ प्रकल्पात सध्या उपलब्ध असलेले पाणी पिण्याव्यतिरिक्त इतर अन्य प्रयोजनासाठी वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. याकरिता फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आलेल्या ९२ मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये वाशिम तालुक्यातील एकबुर्जी, अनसिंग, बोराळा, धुमका, खंडाळा, शिरपुटी, उमरा शम., वारला, उमरा कापसे, जनुना सोनवळ, शेलू खु., वारा जहांगीर, सुरकंडी, अडगाव बॅरेज, गणेशपूर बॅरेज, कोकलगाव बॅरेज, ढिल्ली बॅरेज, उकळी बॅरेज, जुमडा बॅरेज, राजगाव बॅरेज, टनका बॅरेज, जयपूर बॅरेज, सोनगव्हाण बॅरेज, मालेगाव तालुक्यातील सोनल, बोरगाव, कळंबेश्वर, डव्हा, कुऱ्हळ, मसला खु., रिधोरा, सोनखास, सुकांडा, सुदी, ऊर्ध्वमोर्णा, चाकातीर्थ, अडोळ, धारपिंप्री, कुत्तरडोह, मैराळडोह, रिसोड तालुक्यातील कोयाळी, नेतन्सा, धोडप,गणेशपूर, गौढाळा, जवळा, करडा, कोयाळी, मांडवा, पाचंबा, वाघी, वरुड बॅरेज, वाडीरायताळ, कुकसा, वाकद, मंगरूळपीर तालुक्यातील कोलंबी, मोहरी, मोतसावंगा, नांदखेडा, पिंप्री खुर्द, सार्सी बोध, सावरगाव, सिंगडोह, जोगलदरी, चोरद, कासोळा, मानोरा तालुक्यातील हमदरी, असोला गव्हा, बोरव्हा, चिखली, फुलउमरी, गिरोली, कारली, पंचाळा, रतनवाडी, रोहणा, रुई, वाईगौळ, वाठोद, गोंडेगाव, कुपटा, कारंजा तालुक्यातील अडाण, हिवरा लाहे, सोहळ, बेलमंडळ, बग्गी, मोहगव्हाण, झोडगा, उद्री, येवता, धामणी, वडगाव व किनखेडा आदी प्रक्लापांचा समावेश आहे.   १८ नोव्हेंबर २०१७ पासून हा आदेश लागू करण्यात आला असून. १८ जानेवारी २०१९ पर्यंत लागू राहणार आहे.

टॅग्स :DamधरणWaterपाणी