शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?
2
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
3
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
4
1 जुलैपासून नवा कोच राहुल द्रविडची जागा घेणार; बीसीसीआयने अर्ज मागविले, या अटी ठेवल्या....
5
एका अटीवर सलमान खानला माफ करु शकतो बिष्णोई समाज, वाचा काय आहे नेमका तोडगा
6
"वारसा चालवण्यासाठी मुल जन्माला घालण्यात अर्थ नाही, जर..," पाहा काय म्हणाले Zerodhaचे Nikhil Kamath
7
इराणचं चाबहार बंदर भारताच्या ताब्यात; अमेरिकेला मिरची झोंबली, चीन-पाकलाही धक्का
8
होर्डिंग पडलेल्या ठिकाणीच नेते भिडले! संजय दिना पाटील किरीट सोमय्यांवर भडकले
9
'घोटाळ्याच्या चौकशीसाठी भुजबळांनी...';राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट मोदींना लिहीलं पत्र
10
पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला; घाटकोपर दुर्घटनेत युवकाचा दुर्दैवी अंत
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; श्रीराम फायनान्सचे शेअर्स वधारले, सिप्लाच्या शेअरमध्ये घसरण
12
EPFO ची कोट्यवधी लोकांसाठी गूड न्यूज! घर, लग्न, आजार, शिक्षणासाठी ऑटो क्लेम सोल्युशन लाँच; पाहा
13
सावत्र लेक दिया मिर्झाला म्हणत नाही आई, अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली- "ती मला..."
14
पीओकेमधील गोंधळामुळे पाकिस्तान सरकारने गुडघे टेकले! २३ अब्ज रुपयांचा निधी जाहीर
15
LICची लखपती स्कीम! केवळ रोज ₹४५ रुपये जमा करून मिळवू शकता ₹२५ लाख; पाहा संपूर्ण डिटेल
16
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
17
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
18
ईशा गुप्ताने केले आहेत Eggs Freeze, म्हणाली- "मी आज ३ मुलांची आई असते, पण..."
19
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
20
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता

‘ऑनलाइन मोड्युल’ ठेवणार कृषी सेवा केंद्रांवर ‘वॉच’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 1:48 AM

वाशिम: कृषी सेवा केंद्रांच्या कारभाराची इत्थंभूत दैनंदिन माहिती सहज उपलब्ध व्हावी आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे शक्य व्हावे म्हणून ‘ऑनलाइन मोड्ययुल’ विकसित करण्याचे काम कृषी विभागाने सुरू केले आहे. कृषी विकास अधिकार्‍यांनी ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे, येत्या काही दिवसांतच हे ऑनलाइन मोड्युल वापरात येणार आहे. 

ठळक मुद्देकृषी विकास अधिकार्‍यांची योजना स्मार्ट फोनवरून माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: कृषी सेवा केंद्रांच्या कारभाराची इत्थंभूत दैनंदिन माहिती सहज उपलब्ध व्हावी आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे शक्य व्हावे म्हणून ‘ऑनलाइन मोड्ययुल’ विकसित करण्याचे काम कृषी विभागाने सुरू केले आहे. कृषी विकास अधिकार्‍यांनी ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे, येत्या काही दिवसांतच हे ऑनलाइन मोड्युल वापरात येणार आहे. मागील काही दिवसांत कीटकनाशकांची फवारणी करताना शेकडो शेतकर्‍यांचा मृत्यू झाला. यामुळे राज्यभरात खळबळ माजली आणि शासनाने त्याची दखल घेतली. वाशिम जिल्ह्यात जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाने पूर्वीच जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांची तपासणी क रण्याचा निर्णयही घेतला. दरम्यान, यवतमाळ जिल्ह्यात घडलेल्या दुर्घटनांचा पृष्ठभूमीवर कृषी सेवा केंद्रांच्या व्यवहारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. त्यामुळे कृषी सेवा केंद्रांचे रेकॉर्ड नियमित आणि अचूकतेने तपासण्याची गरज निर्माण झाली. त्यामुळे कृषी सेवा केंद्रांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी आधुनिक पद्धतीचा अवलंब करण्याची कल्पना जिल्हा कृषी विकास अधिकार्‍यांना सुचली. या कल्पनेतूनच त्यांनी कृषी सेवा केंद्रधारकांची अद्ययावत माहिती घेण्यासाठी ‘ऑनलाइन मोड्युल’ तयार करण्याचा निर्णय घेतला. मोबाइल अँपच्या धर्तीवर हे मोड्युल तयार करण्यात येत असून, यासाठी एनआयसीच्या तंत्रज्ञांचा आधार ते घेत आहेत.   कृषी सेवा केंद्रधारकांना या मोड्युलचा वापर करण्यासाठी व्हॉट्स अँपप्रमाणे ते डाउनलोड करून नोंदणी करताना प्रतिष्ठानासह स्वत:ची संपूर्ण माहिती भरावी लागणार आहे. एकदा हे मोड्युल डाउनलोड झाले की, त्यामध्ये कृषी सेवा केंद्रांनी दिवसाला केलेल्या व्यवहाराची माहिती भरावी लागेल. कृषी सेवा केंद्रांनी एका दिवशी कोणत्या कंपनीचे, कोणते बियाणे, कोणते वाण आणि किती विकले याची इत्थंभूत माहिती त्यात नमूद असेल. या मोड्युलचे दुय्यम स्तरावरील नियंत्रण तालुका कृषी अधिकारी, तत्सम कृषी अधिकार्‍यांकडे, तर अंतिम नियंत्रण हे कृषी विकास अधिकार्‍यांकडे असणार आहे. तालुका कृषी अधिकार्‍यांना त्यांच्या तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांचे रोजचे व्यवहार आरामात तपासता येतील, तर जिल्हा कृषी विकास अधिकार्‍यांना संपूर्ण जिल्हाभरातील कृषी सेवा केंद्रांचे व्यवहार तपासता येणार आहेत. ही प्रणाली दिवसेंदिवस अद्ययावतही करण्यात येणार आहे. त्यामुळे कृषी सेवा केंद्राचा कागदी लेखाजोखा या मोड्युलमुळे खरा की, खोटा ते कळण्यास मोठी मदत होणार आहे. 

दरफलक ासह इतर माहितीसाठीही आधुनिक पर्याय जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांना माहिती फलक नमूद करणे अनिवार्य करण्यात आले आहे. तथापि, शेकडो कंपन्यांच्या उत्पादनांची नावे, त्यांचे रोज बदलणारे दर आणि इतर माहिती दर दिवशी बदलणे कृषी सेवा केंद्रांना शक्य होणार नाही. त्यासाठीही एक पर्याय जिल्हा कृषी विकास अधिकार्‍यांनी सुचविला आहे. वेगवेगळय़ा उत्पादनांच्या जाहिरातीसाठी वापरण्यात येणार्‍या एलईडी स्क्रीन, तसेच रेल्वेस्टेशनवर प्रवाशांना गाड्यांची माहिती देणार्‍या स्क्रीन किंवा पंचतांकित उपाहागृहात ग्राहकांच्या माहितीसाठी लावण्यात येणार्‍या स्क्रीनच्या धर्तीवर एलईडी स्क्रीन दुकानांत लावून त्याची जोडणी दुकानाच्या संगणकाशी करून दुकानांत उपलब्ध असलेली उत्पादने, दर, कृषी अधिकार्‍यांचे संपर्क क्रमांक, कं पनीची नावे, त्या स्क्रीनवर दाखविण्याचा सल्ला कृषी सेवा कें द्रांना त्यांनी दिला. त्यांच्या या सूचनेला जिल्ह्यातील अनेक कृषी सेवा केंद्रधारकांचे सर्मथनही लाभले आहे. असा प्रयोग करणारा वाशिम हा राज्यातील पहिलाच जिल्हा ठरणार आहे.  

कृषी सेवा केंद्रांची रोजची माहिती तपासणे हे काम अशक्य नसले तरी, त्यामध्ये अडचणी येतात. हे काम सोपे व्हावे आणि त्यांच्यावर नियंत्रण असावे म्हणून ऑनलाइन मोड्युल तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये कृषी सेवा केंद्रधारकांना नोंदणी करून घ्यावी लागेल आणि त्यात रोजच्या व्यवहाराची माहिती भरावी लागेल. शेतकर्‍यांचा व्यवहार कागदोपत्री झाला तरी, ती माहिती या मोड्युलमध्ये नमूद होणार असल्याने आम्हाला वाटेल तेव्हा या मोड्युलच्या आधारे कृषी सेवा कें द्रांचा लेखाजोखा सहज तपासता येईल. प्राथमिक स्वरूपात जानेवारी महिन्यापासून हे मोड्युल वापरण्यास सुरुवात होईल. -नरेंद्र बारापत्रेकृषी विकास अधिकारी

टॅग्स :Waterपाणी