शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
2
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
3
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
4
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
5
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
6
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
7
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
8
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
9
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
10
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
11
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
12
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
13
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
14
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
15
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
16
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
18
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
19
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
20
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."

भारत-चीन सीमेवर वाशिमचा जवान अमोल गोरे शहीद; शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

By नंदकिशोर नारे | Updated: April 18, 2023 20:27 IST

पाण्यात वाहून जाणाऱ्या सहकाऱ्यांना वाचवताना वीरमरण.

वाशिम : भारत-चीन सीमेवर अरुणाचल प्रदेशात वापरी यांग बुंग नाला इस्ट कामेंग येथे सहकाऱ्याला वाचवण्याच्या प्रयत्नात वाशिम तालुक्यातील सोनखास येथील पॅरा कमांडो अमोल तानाजी गोरे या भारतीय जवानाला वीरमरण आले. ही वार्ता कळताच जिल्हाभरातून शोक संवेदनांसह अमोलला श्रद्धांजली वाहिली जात आहे.

पॅरा कमांडो अमोल गोरे आणि त्यांचे दोन सहकारी जवान चीन सीमेवर गस्तीवर असताना अरुणाचल प्रदेशातील कांमेंग व्हॅली येथे मुसळधार पाऊस आणि वेगाने वारे वाहत होते. यादरम्यान पाण्याचा मोठा प्रवाह त्यांच्या दिशेने आला. या प्रवाहात अमोल व त्याचे दोन सहकारी जवान वाहून जात असताना अमोलने जिवाची पर्वा न करता त्यांना पाण्याच्या प्रवाहातून वाचवण्याचा प्रयत्न केला.

त्यात आपल्या दोन सहकारी जवानांना वाचविण्यात त्याला यश आले. मात्र, या प्रयत्नात अमोलच्या डोक्याला पाण्याच्या प्रवाहातील एक मोठा दगड लागल्याने तो गंभीर जखमी झाला. यातच अमोल गोरेला वीरमरण आले. अमोलच्या पश्चात पत्नी वैशाली, दोन मुले, शेतकरी असलेले वडील तानाजी गोरे, आई, एक भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे.

२०१० मध्ये झाला होता सैन्यात दाखलशेतकरी कुटुंबात जन्मलेल्या अमाेलला देशसेवेची ओढ होती. त्यासाठी खडतर परिश्रम घेत सन २०१९ मध्ये अमोल भारतीय सैन्यात भरती झाला होता. अमोलचे लग्न वैशाली यांच्याशी सन २०१६ मध्ये झाले. अमोलने सैन्यात असताना पोहण्याचे प्रशिक्षणही घेतले होते. तो पोहण्यात तरबेज होता.

आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

अमोलचे पार्थिव आज रात्री २ वाजता विमानाने गुवाहाटी येथून पुणे येथे पोहोचणार आहे. पुणे येथे पोहोचताच त्याला सैन्याच्या वतीने मानवंदना दिल्यानंतर लष्कराच्या वाहनाने अमोलचे पार्थिव वाशिम तालुक्यातील सोनखास येथे १९ एप्रिल रोजी सकाळी पोहोचणार आहे. शहीद अमोल गोरेवर सकाळी ८ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

२४ एप्रिलला येणार होता सुटीवरगेल्या ३ ते ४ महिन्यांपूर्वी अमोलची अरुणाचल प्रदेशात पोस्टिंग झाली होती. तो २४ एप्रिल रोजी सुटीवर घरच्या मंडळींच्या भेटीसाठी येणार होता. तत्पूर्वीच त्याला वीरमरण आल्याने परिवाराची भेट घेण्याची त्याची इच्छा अधुरीच राहिली. अमोलसारखा धाडसी व मनमिळाऊ जवान शहीद झाल्याने संपूर्ण वाशिम जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

 

टॅग्स :washimवाशिमIndian Armyभारतीय जवानSoldierसैनिकDeathमृत्यू