शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

रक्ताचं नातं घट्ट करण्यासाठी सरसावले वाशिमकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 10:03 IST

Lokmat Event : रक्ताचं नातं घट्ट करण्यासाठी वाशिमकर सरसावले असल्याचे  दिसून येते.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ‘लोकमत’चे संस्थापक संपादक श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त २ ते १५ जुलैदरम्यान महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात सामाजिक, प्रशासकीय, वैद्यकीय, राजकीय, उद्योजक, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून, रक्ताचं नातं घट्ट करण्यासाठी वाशिमकर सरसावले असल्याचे  दिसून येते.आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये कधी काय होईल याची शाश्वती देता येत नाही. अपघाताच्या घटनांमध्ये रुग्णाचा प्राण वाचविण्यासाठी रक्ताची आवश्यक भासते. काही रुग्णांचा वेळेवर रक्त न मिळाल्यामुळे मृत्यू  होतो. कोरोनाकाळात रक्ताची प्रचंड टंचाई निर्माण झाली. ही गरज भागविण्यासाठी ‘लोकमत’ समूहाने महारक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. जिल्ह्यातील रक्तदात्यांनी स्वयंस्फूतीर्ने पुढे येऊन या पवित्र कार्यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस विभाग, रक्तदान ग्रुप, साई मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल वाशिम यांच्यासह विविध सामाजिक संघटनांनी केले आहे.

रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून, अपघाताच्या घटनांमध्ये रुग्णाचा प्राण वाचविण्यासाठी रक्ताची गरज भासते. रक्ताचं नातं जोपासण्यासाठी सर्वांनी रक्तदान करावे.  मी स्वत: देखील रक्तदान करणार आहे.- वसंत परदेशीजिल्हा पोलीस अधीक्षक वाशिम

रक्तदानामुळे अनेक फायदे होतात. मी स्वत: रक्तदान करणार आहे. रक्तदान हे तीन महिन्यांत एकदा म्हणजेच वर्षातून ४ वेळा करता येते. रक्तदान जीवनदान होय.- डॉ. विवेक साबू, संचालक, साई मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल वाशिम

रक्ताची गरज आणि तुटवडा लक्षात घेता प्रत्येकाने रक्तदान करणे आवश्यक आहे.  रक्तदानामुळे गरजूंचे प्राण वाचतात. आमचा रक्तदान ग्रुप रक्तदानाच्या या महायज्ञात सहभागी होत असून, सर्वांनी सहभाग नोंदवावा.- पंकज गाडेकरअध्यक्ष, रक्तदान ग्रुप वाशिम

टॅग्स :washimवाशिमLokmat Eventलोकमत इव्हेंट