शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्हा परिषद अभियंते दुसऱ्या दिवशीही सामुहिक रजेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 16:38 IST

वाशिम : विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषद अभियंता संघटनेचे सर्व पदाधिकारी २० मार्च रोजीदेखील सामुहिक रजा आंदोलनावर असल्याने कामकाज ठप्प झाले होते.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेच्या अभियंता संघटनेने विविध टप्प्यात आंदोलन पुकारले आहे. विविध मागण्या निकाली काढण्याची मागणी अभियंता संघटनेने लावून धरली. जिल्हा परिषदेच्या विविध संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.

वाशिम : विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषद अभियंता संघटनेचे सर्व पदाधिकारी २० मार्च रोजीदेखील सामुहिक रजा आंदोलनावर असल्याने कामकाज ठप्प झाले होते.

जिल्हा परिषद अभियंता संघटनेच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या अभियंता संघटनेने विविध टप्प्यात आंदोलन पुकारले आहे. १९ व २० मार्च रोजी अभियंत्यांनी सामुहिक रजा आंदोलन केले. जिल्हा परिषद अभियंता संघटना, महाराष्ट्र या नोंदणीकृत संघटनेस शासन मान्यता देणे, जि.प. अभियंत्यांना प्रवासभत्त्यापोटी दरमहा किमान १० हजार रुपये मासिक वेतनासोबत अदा करणे, उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने दिलेल्या निर्देशानुसार नवीन उपविभाग तत्काळ निर्माण करणे, जिल्हा परिषदेकडील अभियंता सवंर्गास शाखा अभियंता पदाचा दर्जा देण्याचा दिनांक व त्या बाबत करावयाची वेतन निश्चिती, यासह विविध मागण्या निकाली काढण्याची मागणी अभियंता संघटनेने लावून धरली. दरम्यान, २० मार्च रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. जिल्हा परिषद अभियंता संघटनेच्या प्रलंबित मागण्या शासनाने निकाली काढाव्या, याबाबत पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन देशमुख यांनी आंदोलनकर्त्यांना दिले. यावेळी  संघटनेचे वाशिम जिल्हाध्यक्ष विश्वास घुगे, जिल्हा सचिव प्रवीण दुरतकर, कार्याध्यक्ष महेश कान्हेरकर, कोषाध्यक्ष तेजराव जाधव यांच्यासह विविध विभागांचे अभियंते सहभागी होते. दरम्यान, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटना (रजि.नं. ६१५) यासह जिल्हा परिषदेच्या विविध संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषदagitationआंदोलन