शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम:  कोकलगाव-एकबुर्जी जलवाहिनीचे काम वेगात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 15:17 IST

वाशिम: गतवर्षीच्या अल्प पावसामुळे वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी धरणातील जलसाठा आटल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देनगर पालिकेने कोकलगाव येथील बॅरेजमधील पाणी वाशिम शहराला देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता.बॅरेजवर अवलंबून असलेल्या गावांतील शेतकरी आणि ग्रामस्थांकडून या योजनेला मोठ्या प्रमाणात विरोध झाला. शासनाच्या आदेशानुसार पोलीस बंदोबस्तात या योजनेच्या कामाला १५ दिवसांपूर्वी सुरुवात झाली.

वाशिम: गतवर्षीच्या अल्प पावसामुळे वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी धरणातील जलसाठा आटल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यासाठी कोकलगाव बॅरेजमधून एकबुर्जीत पाणी आणण्याची तात्पुरती योजना मंजूर झाली असून, वाशिम नगर पालिकेच्यावतीने या योजनेच्या जलवाहिनीचे काम वेगात करण्यात येत आहे. या जलवाहिनीसाठी १२ किलोमीटरचे खोदकामही पूर्ण झाले असून, दोन किलोमीटरपर्यंत जलवाहिनी टाकण्यात आली आहे.

वाशिम शहरात गतवर्षीच्या अपुऱ्या पावसानंतर पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मे आणि जून महिन्यांत पाण्यासाठी हाहाकार होण्याची शक्यता असल्याने नगर पालिकेने कोकलगाव येथील बॅरेजमधील पाणी वाशिम शहराला देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. जवळपास १२ कोटी रुपयांच्या या योजनेला शासनाची मंजुरी मिळाली; परंतु कोकलगाव बॅरेजवर अवलंबून असलेल्या गावांतील शेतकरी आणि ग्रामस्थांकडून या योजनेला मोठ्या प्रमाणात विरोध झाला. तो विरोध वाढतच असल्याने योजनेचे काम रखडले होते. अखेर शासनाच्या आदेशानुसार पोलीस बंदोबस्तात या योजनेच्या कामाला १५ दिवसांपूर्वी सुरुवात झाली. त्यानंतर १२ दिवसांतच या योजनेच्या जलवाहिनीसाठी १२ किलोमीटर अंतराचे खोदकामही पूर्ण झाले असून, २ किलोमीटर अंतरापर्यंत जलवाहिनीही टाकण्यात आली आहे, तसेच पाणी खेचण्यासाठी ठिकठिकाणी आवश्यक त्या सुविधेचे कामही करण्यात आले आहे. येत्या महिनाभरातच या योजनेचे काम पूर्ण होऊन वाशिम शहराला पाणी पुरवठा सुरू होण्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. 

टॅग्स :washimवाशिमDamधरणWaterपाणी