शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वाशिममध्ये दारुबंदीविरोधात महिलांचा एल्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2018 13:49 IST

ग्राम कार्ली येथे सुरू असलेल्या अवैध दारूविक्री संदर्भात गावातील महिला बचत गटाने एल्गार पुकारला आहे.

वाशिम  :  ग्राम कार्ली येथे सुरू असलेल्या अवैध दारूविक्री संदर्भात गावातील महिला बचत गटाने एल्गार पुकारला आहे. गावात दारुबंदी त्वरित करण्यात यावे , अशी मागणी विविध महिला बचत गटाच्यावतीने राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाकडे करण्यात आली आहे. कार्ली या गावाची एकूण लोकसंख्या जवळपास दोन हजार आहे. अनेक जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने संसार करत आहेत. परंतु येथे अवैध दारु विक्री होत असल्यानं गावातील सुज्ञ नागरिकांच्या विरोधामुळे पोलिसांनी कठोर कार्यवाही करुन अवैध गावठी दारु विक्री बंद केली, परंतु मागील चार ते पाच वर्षांपासून गावठी दारूऐवजी अवैध बेकायदेशीररित्या देशी दारु विकण्याचा गोरखधंदा गावातील काही व्यक्तींकडून सर्रासपणे होत आहे. 

गावात दारु विक्री करणा-यांवर तात्काळ कठोर कारवाई करावी अन्यथा अवैध देशी दारु विक्री करणा-यावर कठोर कार्यवाही करावी अन्यथा सर्व महिला बचत गटाचवेतीने आमरण उपोषणास बसावे लागेल, असा इशारा संबंधितांना निवेदनाद्वारे दिला आहे. 

निवेदनावर चंद्रकला गोविंदा पाटील, रमाबाई प्रल्हाद पाटील, दुर्गाबाई केशव पाटील, लिलाबाई सुधाकर पाटील, कमलाबाई उत्तम भगत,  रमाबाई शेषराव पाटील, जिजाबाई रामराव मोरे, निर्मला लक्ष्मण मोरे, मंगला भगवान कदम, मिनाबाई सुरेश काकडे,सुनिता शमराव पाटील, विद्या राजु भगत,  चंद्रभागा गजानन पडघान, भाग्यरथी दयाराम पखाले, आरती संजय पडघान, मनकर्णा रमेश पडघान, अनुसया गोविंदा मुळे, पदमाबाई केश्व पाटील, विश्रांतीबाई भास्कर राऊत, आश श्रीधर पाटील, बेबी नामदेव पाटील यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षरी आहेत.

याबाबत अनेक वेळा गावातील महिला-पुरुषांकडून विरोध केला गेला. याबाबतची माहिती पोलिसांना देण्यातही आली. परंतु असे निदर्शनास आले की, पोलिसांच्या आशीर्वादाने ही मंडळी आपली देशी दारु विकण्याची दुकान मोठ्या थाटामाटात चालवितात. ही माणसे अत्यंत गुंड प्रवृत्तीचे असल्यामुळे त्यांच्या विरोधात कोणीही बोलण्यास धजत नाही, तरी वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदीagitationआंदोलन