शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : वारकर्‍यांच्या मृत्यूने गहिवरले उमरा कापसे गाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 01:31 IST

वाशिम: संत गजानन महाराजांच्या प्रकट दिन महोत्सवानिमित्त तालुक्यातील उमरा कापसे येथून शेगावला गेलेल्या वारीतील वाहनाला ५ फेब्रुवारी रोजी दुपारी ४.३0 वाजताच्या सुमारास बाळापूर-पातूर मार्गावरील बाघ फाट्यानजीक ट्रकने धडक दिली. यात चार भाविकांचा मृत्यू झाला. त्यात जवळा येथील एकासह उमरा कापसे येथील तिघांचा समावेश आहे. दरम्यान, या दुर्दैवी घटनेमुळे दोन्ही गावांवर दु:खाची छाया पसरली असून, चार वारकर्‍यांच्या मृत्यूमुळे ग्रामस्थ गहिवरून गेले आहेत.  

ठळक मुद्देअपघाताची वार्ता कळताच गावात पसरली शोककळा शेगावला निघालेल्या वारकर्‍यांच्या वाहनास ट्रकची धडक

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: संत गजानन महाराजांच्या प्रकट दिन महोत्सवानिमित्त तालुक्यातील उमरा कापसे येथून शेगावला गेलेल्या वारीतील वाहनाला ५ फेब्रुवारी रोजी दुपारी ४.३0 वाजताच्या सुमारास बाळापूर-पातूर मार्गावरील बाघ फाट्यानजीक ट्रकने धडक दिली. यात चार भाविकांचा मृत्यू झाला. त्यात जवळा येथील एकासह उमरा कापसे येथील तिघांचा समावेश आहे. दरम्यान, या दुर्दैवी घटनेमुळे दोन्ही गावांवर दु:खाची छाया पसरली असून, चार वारकर्‍यांच्या मृत्यूमुळे ग्रामस्थ गहिवरून गेले आहेत.  उमरा कापसे या गावातून गेल्या २१ वर्षांपासून श्री क्षेत्र शेगाव येथे गजानन महाराज यांच्या प्रकट दिन महोत्सवानिमित्त पायदळ दिंडी सोहळा काढण्यात येतो. यंदा या सोहळय़ात परिसरातील चार ते पाच गावातील १७0 हून अधिक वारकरी सहभागी झाले होते. ही वारी ५ फेब्रुवारीला दुपारच्या सुमारास अकोला जिल्ह्यातील पातूर-बाळापूर मार्गावरील बाघ फाट्यानजीक पोहोचली असता, वारीसोबत असलेल्या तीनचाकी वाहनास मागून येणार्‍या ट्रकने जबर धडक दिली. यावेळी ट्रक उलटून त्यात असलेले सरकीचे पोते अंगावर पडल्याने चार भाविक ठार, तर तीन जण गंभीर जखमी झाले. मृतकांमध्ये काशिनाथ चंद्रभान कापसे (६५), रमेश धनाजी कापसे (३५), लिलाबाई बळीराम कापसे (५८) सर्व रा. उमरा आणि रामजी नामदेव काकडे (५0) रा. जवळा, यांचा समावेश आहे. जखमींमध्ये बळीराम रामजी कापसे (६५), किसनाबाई साबळे (५५) आणि सारजाबाई काशिनाथ कापसे (५८), या तिघांचा समावेश आहे. यातील बळीराम कापसे व किसनाबाई कापसे यांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर जवळा आणि उमरा कापसे या दोन्ही गावांमधील ग्रामस्थ अक्षरश: गहिवरून गेले. तथापि, मृतकांच्या कुटुंबाला माहिती देण्याचे ग्रामस्थांनी कटाक्षाने टाळले. गत २१ वर्षांपासून दरवर्षी निघणार्‍या वारीतील चौघांचा मृत्यू झाल्याचे दु:ख ग्रामस्थांना अनावर झाले होते.

अपघातात दोन चिमुकल्यांचे हरविले पित्रुछत्र!उमरा कापसे येथून शेगाव येथे जात असलेल्या वारीतील वाहनाचा अपघात होऊन चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामध्ये रमेश कापसे यांचाही समावेश आहे. रमेश हे अल्पभूधारक शेतकरी आणि ऑटोरिक्षा चालक असून, त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक १४ वर्षांची मुलगी (वैष्णवी) आणि एक ८ वर्षांचा मुलगा आहे. या अपघातामुळे रमेशच्या दोन्ही मुलांचे पित्रुछत्र हरविल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे या वारीत रमेश कापसे यांच्यासोबत त्यांची मुलगी वैष्णवीसुद्धा सहभागी झाली होती. त्यामुळे पित्याचा अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तिच्या डोळय़ादेखतच घडली. दरम्यान, याच अपघातात मृत्युमुखी पडलेले रामजी काकडे यांना दोन मुले आणि दोन मुली आहेत. त्यापैकी एक मुलगा अविवाहित असून, घरातील कर्त्या पुरुषाचा असा अचानक मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबावरही दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

रमेश अन् रामजींची पहिलीच वारी ठरली शेवटची!उमरा कापसे येथून गेल्या २१ वर्षांपासून गजानन महाराज प्रकट दिन सोहळय़ासाठी जाणार्‍या पालखी सोहळय़ात परिसरातील शेकडो भाविक उत्साहाने सहभागी होतात. त्यामध्ये उमरा येथून १00 च्यावर, तर जवळा येथूनही दरवर्षी चार ते पाच भाविक सहभागी होत असतात. यंदा या पालखी सोहळय़ात पहिल्यांदाच उमरा येथील रमेश धनाजी कापसे आणि जवळा येथील रामजी काकडे यांनी सहभाग घेतला. संत गजानन महाराजांचे दर्शन घ्यावे, ही त्यांची इच्छा; पण संबंधित दोघांवरही त्यापूर्वीच काळाने झडप घातल्याने दोघांचीही ही पहिली वारी शेवटची ठरली. 

उमरा कापसे येथे शांतता!बाळापूर-पातूर मार्गावर ५ फेब्रुवारीला दुपारच्या सुमारास घडलेल्या या अपघाताच्या घटनेची वार्ता कळताच ‘लोकमत’च्या चमूने उमरा कापसे गाव गाठून परिस्थिती जाणून घेतली. यादरम्यान गावातील अनेक जण घटनास्थळ गाठण्यासाठी तत्काळ रवाना झाल्याचे तद्वतच गावातील इतर मंडळींनी एकत्र येत मृत्युमुखी पडलेल्या वारकर्‍यांच्या कुटुंबियांना घटनेची माहिती कळू नये, याची बहुतांशी दक्षता घेतल्याचे जाणवून आले. 

टॅग्स :washimवाशिमAccidentअपघात