शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

वाशिम : मालेगाव-मेहकर मार्गावर ट्रक व बसची धडक; बसमधील १५ प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 19:18 IST

मालगाव - ट्रक व बसमध्ये अपघात होऊन १५ जण जखमी झाल्याची घटना मालेगाव ते मेहकर मार्गावरील टोलनाक्याजवळ गुरूवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. तीन जण गंभीर जखमी असून, त्यांना पुढील उपचारार्थ अकोला हलविण्यात आले.

ठळक मुद्देओव्हरटेक करत असताना झाला अपघातवडप येथील बंद टोलनाक्याजवळ घडली दुर्घटनातीन गंभीर जखमींना उपचारार्थ अकोल्याला हलविलेइतर जखमींवर मालेगावातील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्कमालगाव - ट्रक व बसमध्ये अपघात होऊन १५ जण जखमी झाल्याची घटना मालेगाव ते मेहकर मार्गावरील टोलनाक्याजवळ गुरूवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. तीन जण गंभीर जखमी असून, त्यांना पुढील उपचारार्थ अकोला हलविण्यात आले.एम.एच.४ डी.एस.३५५९ क्रमांकाचे रेतीची वाहतुक करणारे टाटा ४०७ वाहनाचे चालक विश्वंबर श्रीराम शिंदे वय रा.देवठाणा  ता.मंठा जि.जालना हे तळणीवरुन मालेगाव येथे रेती आणत होते तर मंगरुळपीर अगाराची एम.एच.४० एन.९८९६ क्रमांकाची मंगरुळपीर ते जालना  ही बस मालेगाववरुन जालनाकडे जात होती. वडप येथील बंद टोलनाक्याजवळ टाटा  ४०७ वाहन एका ट्रकला ओव्हरटेक करताना समोरुन आलेल्या बसवर समोरासमोर धडकले. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने यामध्ये कोणतीही प्राणहानी झाली नाही.

बसमधील १५ प्रवासी जखमी झाले. बस चालक मुंतजी मोद्दीन शेख (४४) रा.मंगरुळपीर, महादेव विष्णुराव वाघमोडे (२८) रा.तळणी, टाटाचालक विश्वंभर शिंदे रा.देवठाणा ता.मंठा हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने अकोला येथे हलविण्यात आले. या अपघातात त्र्यंबकेश्वर शिवाजी घायाळ (२३) रा.वाशिम, सुरेश वामन खिल्लारे (४०) रा.मेडशी, दिलीप मोतीराम सोनोने (मंगरुळपीर), प्रकाश शंकरराव वानखेडे (४५) आमडापुर, आशा देविदास निकम (५५) चिखली, चंंद्रकांत कचरु फुलझाडे (७०) देऊळगाव माळी, सचिन सहदेव शिरसाठ, अजय सुधाकर ताजणे (२२) रा. मालेगाव,  शितल हरी तायडे (३५) मेडशी व बाळु शिंदे (३३) देवठाणा ता.मंठा जि.जालना व अन्य दोज जण असे जखमी झाले आहेत. त्यांना ग्रामीण रुग्णालयात मालेगाव येथे भरती करुन वैद्यकीय अधिकारी  डॉ.सचिन वाढे व इतर डॉक्टर कर्मचारी यांनी उपचार केले. घटनेची माहिती मिळताच मालेगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलीस उपनिरीक्षक जयकांत राठोड, पोलीस कर्मचारी पंजाब पवार यांच्यासह अन्य कर्मचाºयांनी या मार्गावरील वाहतुक सुरूळीत करण्याचा प्रयत्न केला. अर्ध्या तासानंतर वाहतूक सुरळीत झाली.  वृत्त लिहीपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया मालेगाव पोलीस ठाण्यात सुरू होती.

टॅग्स :Accidentअपघातwashimवाशिम