शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील अवैध प्रवासी वाहतूकीवर धडक कारवाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 17:55 IST

जिल्हा वाहतूक विभागाने अवैध प्रवासी वाहतूकीवर धडक कारवाईस सुरूवात केली असून गेल्या दोन दिवसांत ५० च्या आसपास केसेस करण्यात आल्याचे जिल्हा वाहतूक निरीक्षक बाबुसिंग राठोड यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील ग्रामीण भागात अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात फोफावली असून महिन्याकाठी लाखो रुपयांची उलाढाल (हप्ता वसूली) यामाध्यमातून होत असल्याचे गंभीर वास्तव ‘लोकमत’ने ४ मार्च रोजी ‘जिल्ह्यात अवैध वाहतुकीला उधाण’, या मथळ्याखाली प्रकाशित केलेल्या वृत्ताच्या माध्यमातून उघड केले. त्याची दखल घेवून जिल्हा वाहतूक विभागाने अवैध प्रवासी वाहतूकीवर धडक कारवाईस सुरूवात केली असून गेल्या दोन दिवसांत ५० च्या आसपास केसेस करण्यात आल्याचे जिल्हा वाहतूक निरीक्षक बाबुसिंग राठोड यांनी सांगितले.वाशिम शहरातील पोस्टआॅफीस चौक, पुसद नाका, हिंगोली नाका, अकोला नाका, रिसोड नाका या ठिकाणांहून काळी-पिवळी वाहने आणि आॅटोच्या माध्यमातून क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची नियमबाह्य वाहतूक सुरू होती. यासह जिल्ह्यातील रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर, कारंजा आणि मानोरा या शहरांमधूनही गेल्या काही महिन्यांपासून अवैध प्रवासी वाहतूक जोरात सुरू होती. वेळप्रसंगी छताच्या टपावर प्रवासी घेवून रस्त्याने धावणाºया अशा नियमबाह्य वाहनांमुळे ग्रामीण प्रवाशांचा जीव धोक्यात सापडला होता. दरम्यान, या विषयावर ‘लोकमत’ने ४ मार्च रोजीच्या अंकात सविस्तर वृत्त प्रकाशित करून हा गंभीर प्रश्न उजेडात आणला. त्याची तडकाफडकी दखल घेवून जिल्हा वाहतूक विभागाने ५ मार्चपासून वेगवेगळे पथक गठीत करून त्यांच्यामार्फत अवैध प्रवासी वाहनांवर धडक कारवाईचे सत्र अवलंबिले आहे. त्यामुळे सुरू असलेला अवैध प्रवासी वाहतूकीचा प्रकार काहीअंशी थांबल्याचे निदर्शनास येत आहे.

टॅग्स :washimवाशिमtraffic policeवाहतूक पोलीस