शहरं
Join us  
Trending Stories
1
अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना
2
Mumbai Crime: शिक्षिका आधी कारमध्येच करायची बलात्कार, नंतर हॉटेलमध्ये...; वर्षभर केले विद्यार्थ्याचे शोषण; काय काय घडलं?
3
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
4
आणखी एक मोठा अपघात, वैमानिकाचं नियंत्रण सुटलं, विमानतळाची भिंत तोडून विमान पुढे गेलं
5
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
6
Stock Markets Today: वीकली एक्सपायरीवर तेजीसह उघडला बाजार; सेन्सेक्स २०० अंकांनी वधारला, IT, मेटल शेअर्समध्ये खरेदी
7
कार खरेदीवर ४ लाखांपर्यंत डिस्काउंट; कंपन्या करत आहेत ‘स्टॉक’ क्लीअर
8
सिबिल स्कोअर खराब होता, स्टेट बँकेनं नोकरीच दिली नाही; कोर्टानंही म्हटलं, "पैशांच्या बाबतीत..."
9
भारताची पाकिस्तानवर आणखी एक कारवाई; सेलिब्रिटींबाबत घेतला 'असा' निर्णय!
10
पत्नीसोबत Post Office च्या स्कीममध्ये करा गुंतवणूक; दर महिन्याला मिळेल ₹९००० चं फिक्स व्याज
11
"अभिनेत्यांना सकाळी डाएट फुड अन् रात्री ड्रग्स हवे", पहलाज निहलानींचा खुलासा; अक्षयबद्दल म्हणाले...
12
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
13
बेपर्वाईने गाडी चालवणे आत्ताच थांबवा, मृत्यू झाल्यास नातेवाईकांना इन्शुरन्सचा एकही रुपया मिळणार नाही!
14
स्विमिंगपूलमध्ये पोहून घरी परतताना भीषण अपघात, चार मुलांसह पाच जण ठार!
15
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
16
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
17
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
18
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
19
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
20
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही

वातावरणात गारवा; वाशिमचे तापमान ८.२ अंशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 15:26 IST

वाशिम : जिल्ह्यात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली असून, ३० जानेवारी रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत वाशिम येथील किमान तापमान ८.२ डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली असून, ३० जानेवारी रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत वाशिम येथील किमान तापमान ८.२ डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली आले. वातावरणातील बदलाचा प्रतिकूल परिणाम मानवी आरोग्यासह पिकांवरही होत आहे.गत तीन, चार दिवसांपासून वातावरणात झालेल्या अचानक बदलामुळे हवेत गारवा भरला आहे. थंडीच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. उत्तर भारतात थंडीचा जोर वाढल्याने डिसेंबर महिन्यात वाशिम जिल्हाही मोठ्या प्रमाणात गारठला होता. यामुळे तापमान तब्बल ७.५ अंश सेल्सियसपर्यंत घसरले होते. मात्र, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून गारवा कमी होत तापमान १५ अंश सेल्सियसपेक्षाही वर गेले होते. त्यानंतर पुन्हा एकदा वातावरणात अचानक बदल होत असून, ३० जानेवारी रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत वाशिम येथील किमान तापमान ८.२ डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली घसरले. थंडीत अशीच वाढ होत राहिल्यास हरभरा पिकांवर घाटेअळीचा प्रादुर्भाव होण्याची भीती वर्तविली जात आहे. तसेच भाजीपाला, फळबागा, आंबा मोहरावरदेखील प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविण्यात आली. दिवसभर वातावरणात गारवा जाणवत असल्याने, थंडीपासून बचावासाठी ऊबदार कपडे परिधान करावे लागत आहेत. कडाक्याच्या थंडीमुळे सर्दी, खोकला, ताप आदी स्वरूपातील आजार जडत असल्याचे दिसून येते.

टॅग्स :washimवाशिमweatherहवामान