लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: तालुक्यातील केकतउमरा येथील विठाबाई पसारकर विद्यामंदिरात सोमवारी मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत विद्यार्थ्यांसह तरुणांनी सहभाग घेतला. प्रमुख अतिथीच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेला सुरवात करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख अतिथी अॅथलेटीक्स संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा स्वामी विवेकानंद विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब गोटे, सैनिक प्रविण लगड, विजय पट्टेबहादूर, संस्थेचे सहसचिव अविनाश पसारकर, शाळेच्या मुख्याध्यापिका हर्षाराणी अजबे, उपस्थित होते. वेगवेगळ्या तीन गटांत ही स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये वर्ग पाचवा आणि आठवा यासाठी कनिष्ठ गट व इयत्ता नववी ते बारावी वरिष्ठ गट आणि माजी विद्यार्थ्यांसाठी खुला गट ठेवण्यात आला होता. यामध्ये तीन्ही गटातील ७५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. कनिष्ठ गटामधून अमर चंदू सोनुने याने प्रथम क्रमांक पटकाविला. द्वितीय क्रमांक सुरज केशव धाडवे याने, तृतीय दुर्गेश गोरर्धने, चतुर्थ प्रविण लोखंडे, पाचवा क्रमांक सचिन वानखेडे याने मिळविल. वरिष्ठ गटातून प्रथम क्रमांक गणेश वाठ याने मिळविला तर द्वितीय गणेश थोरात, तृतीय अमर गोडघासे, चतुर्थ क्रमांक ओंकार सुरेकर व पाचवा क्रमांक वैभव भारसकळ याने मिळविला. खुल्या गटामधून सुरज गोडघासे याने प्रथम क्रमांक मिळविला. द्वितीय गणेश धाडवे याने तर महादा तडस याने तृतीय क्रमांक पटकाविला. चतुर्थ क्रमांक जीवन हरीमकर याने मिळविला. सचिन उत्तम पट्टेबहादूर याला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. विजयी विद्यार्थ्यांचा शाळेत सत्कार करण्यात आला. स्पधेर्साठी क्रीडा शिक्षक अनिल थडकर यांनी परिश्रम घेतले. यावेळी प्रशांत डोंगरे, रामेश्वर गायकवाड, माणिक वाकुडकर, वामन घोडे, सारंग पसारकर, भारती डोंगरे, संध्या मानगावकर उपस्थित होते.
वाशिम : केकतउमरा मॅरेथॉन स्पर्धेत धावली तरूणाई!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 19:44 IST
वाशिम: तालुक्यातील केकतउमरा येथील विठाबाई पसारकर विद्यामंदिरात सोमवारी मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत विद्यार्थ्यांसह तरुणांनी सहभाग घेतला.
वाशिम : केकतउमरा मॅरेथॉन स्पर्धेत धावली तरूणाई!
ठळक मुद्देपसारकर विद्यालयचा उपक्रमअनेक तरूणांचा सहभाग