शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम: पेरलेले बियाणे उगवलेच नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 10:45 IST

जिल्ह्यात यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांनी पेरलेले सोयाबीन उगवले नसल्याचा प्रकार घडला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांनी पेरलेले सोयाबीन उगवले नसल्याचा प्रकार घडला आहे. जिल्हाभरातील अनेक शेतकऱ्यांनी या संदर्भात संबंधित तालुका कृषी विभागासह पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे तक्रारीही केल्या आहे. पेरणी झाल्यानंतर आलेला जोरदार पाऊस, तसेच बियाण्यांची उगवण क्षमता कमी असणे, या कारणांमुळे हा प्रकार घडल्याचे प्राथमिक माहितीवरून कळले आहे. दरम्यान, महाबीजकडेही अशा तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा व्यवस्थापकांनी गुरुवारी दिली.जिल्ह्यात यंदाच्या हंगामात साधारणत: जूनच्या दुसºया आठवड्यापासून खरीप पेरणीला सुरुवात झाली. त्या काळात झालेल्या पावसामुळे काही शेतात शेतकºयांनी पेरणी केलेले सोयाबीन उगवले; परंतु गत आठवडाभरात पेरणी केलेले बहुतांश शेतकºयांचे सोयाबीन उगवलेच नसल्याचा प्रकार आता उघडकीस येत आहे. त्यात महाबीजसह इतर खासगी कंपन्या आणि घरगुती बियाण्यांचाही समावेश आहे. जिल्ह्यातील कारंजा, मंगरुळपीर, मानोरा या तीन तालुक्यांत हा प्रकार अधिक प्रमाणात घडला असल्याचे प्राथमिक माहितीवरून दिसत असले तरी जिल्ह्यातील इतरही तालुक्यांत हा प्रकार घडला आहे. शेतकºयांनी या प्रकाराबाबत कृषी विभागासह महाबीजकडेही तक्रारी केल्या आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यात एकूण ४ लाख ६ हजार २३४ हेक्टर खरीप क्षेत्रापैकी १७ जूनपर्यंत १ लाख १४ हजार ६०७ हेक्टर क्षेत्रात अर्थात ५३ टक्के पेरणी उरकली असून, यात १ लाख ६० हजार ९२ हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी झाली आहे. त्यात प्रामुख्याने सोयाबीनचेच बियाणे न उगवल्याच्या तक्रारी शेतकºयांकडून करण्यात येत आहेत. दरम्यान, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांनी या प्रकाराची माहिती मागविली आहे.

दुबार पेरणीतही समस्या उद्भवण्याची भीती गतवर्षीच्या अवकाळी पावसामुळे सोयाबीन पिकाला फटका बसला होता. त्यामुळे कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार यंदाच्या हंगामात शेतकºयांनी बीज प्रक्रिया करून उगवण क्षमता तपासून पेरणी केल्यानंतरही बियाणे न उगवल्याचा प्रकार घडला आहे. यावरून यंदाच्या सोयाबीन बियाण्यांची उगवण क्षमताच खालावल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे शेतकºयांनी सोयाबीन पिकाचीच दुबार पेरणी केल्यास बियाणे न उगवण्याची समस्या पुन्हा उद्भवण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकºयांनी सोयाबीनची दुबार पेरणी करावी की नाही, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

अनेक शेतकºयांकडून सोयाबीन न उगवल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यांना पंचायत समिती कृषी विभागाकडे तक्रार करण्यास सांगण्यात आले असून, या प्रकाराची पाहणी होईल.- डॉ. प्रशांत घावडे, जिल्हा व्यवस्थापक, महाबीज

 

टॅग्स :washimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी