शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कमी उत्पन्नामुळे वाशिम-शिरपूर बसफेऱ्या बंद; प्रवाशांची पंचाईत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 17:33 IST

मानोरा (वाशिम) : तालुक्यातून वाहणाºया अरुणावती नदीचे शहरालगतचे पात्र महिनाभरापासून कोरडे पडले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क शिरपूर जैन (वाशिम): वाशिम येथील आगाराकडून शिरपूर-वाशिम मार्गावर धावणाºया बसफेºया बंद केल्या आहेत. त्यामुळे या मार्गावरील विविध गावातून वाशिम, शिरपूरकडे प्रवास करणाºया शेकडो प्रवाशांची पंचाईत झाली आहे. बसफेºयांचे उत्पन्न घटल्यामुळे त्या बंद करण्यात आल्याचे या संदर्भात घेतलेल्या माहितीवरून कळले असून,यामुळे खासगी अवैध वाहतुकीला चांगलेच बळ मिळाल्याचे स्पष्ट होत आहे. वाशिम शहर हे जिल्ह्याचे ठिकाणी असून, या ठिकाणी असलेल्या जिल्हा कार्यालयांसह विविध कामांसाठी जिल्ह्यातील सर्वच गावांतून हजारो लोक दरदिवशी येतात. यात  शिरपूरसह परिसरातील शेकडो ग्रामस्थांचाही समावेश आहे. या ग्रामस्थांना प्रवासाची सुविधा म्हणून वाशिम आगाराच्या काही बसफेºया नियमित धावत होत्या; परंतु गेल्या काही महिन्यांपूर्वी वाशिम मार्गावर तामसी येथे रस्त्याचे काम सुरु झाल्यानंतर या बसफे ºया बंद करण्यात आल्या. त्या बसफेºया आता कमी उत्पन्नाच्या कारणावरून कायमच बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या मार्गावर विविध ठिकाणी प्रवास करणाºया शेकडो प्रवाशांची पंचाईत झाली आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रिद असलेल्या महामंडळाच्या बसफेºया केवळ उत्पन्नाच्या नावाखाली बंद करण्यात आलेल्या प्रवासीवर्गातून रोष व्यक्त होत असून, याचा फायदा खासगी अवैध वाहतुकीला होत आहे. आता बसफेºया बंद झाल्याने शिरपूर व परिसरातील प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो किंवा शिरपूर येथील ग्रामस्थांना वाशिम येथे येण्यासाठी मालेगावला जावे लागते आणि तेथून बसने वाशिम येथे यावे लागते. याचा आर्थिक भुर्दंड त्यांना बसत असून, वेळही अधिक लागत आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे वाशिम आगाराने बंद केलेल्या सकाळ, दुपार, संध्याकाळच्या तीन बसफेºया पुन्हा सुरू कराव्यात, अशी मागणी शिरपूर परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. 

मागील कित्येक महिन्यापासून वाशिम आगाराने शिरपूर-वाशिम फेºया बंद केल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना वेळेचा व पैशाचा अधिक फटका बसत आहे. वाशिम आगाराने  लग्नसराई लक्षात घेऊन पूर्वीप्रमाणे किमान तीन फेºया तरी पूर्ववत कराव्या.-केशवराव देशमुखशिरपूर जैन   वाशिम-शिरपूर मार्गावर धावणाºया बसफेºयांचे उत्पन्न कमी असल्याने नालईलाजास्तव त्या बसफेºया बंद कराव्या लागल्या. या संदर्भात प्रवाशांची मागणी असेल, तर त्यांनी रितसर अर्ज करावा आम्ही तो विभागीय नियंत्रकांकडे सादर करू. त्यांच्या परवानगीनंतरच बसफेºया सुरू करण्याबाबत निर्णय घेता येईल.- राजेंद्र इलमेआगार व्यवस्थापक वाशिम

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैनstate transportएसटी