शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

Washim: १८६ गावातील प्रक्रिया पूर्ण; प्रत्येकाचे पीआर कार्ड तयार

By दिनेश पठाडे | Updated: October 16, 2023 17:06 IST

Washim News:स्वामित्व योजने अंतर्गत जिल्ह्यातील ६३५ गावांतील मिळकतधारकांना प्राॅपर्टी कार्ड देण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. आतापर्यंत १८६ गावांतील गावकऱ्यांचे प्रॉपर्टी कार्ड तयार झाले असल्याची माहिती जिल्हा भूमीअभिलेख विभागाकडून देण्यात आली.

- दिनेश पठाडेवाशिम : स्वामित्व योजने अंतर्गत जिल्ह्यातील ६३५ गावांतील मिळकतधारकांना प्राॅपर्टी कार्ड देण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. आतापर्यंत १८६ गावांतील गावकऱ्यांचे प्रॉपर्टी कार्ड तयार झाले असल्याची माहिती जिल्हा भूमीअभिलेख विभागाकडून देण्यात आली.

केंद्र सरकारने देशपातळीवर स्वामित्व योजना राबविण्याचा संकल्प केला आहे. या योजनेच्या माध्यमातून देशभरातल्या गावांचे ड्रोन सर्वेक्षणचे काम हाती घेतले. त्यातून प्रत्येक घराचा नकाशा, मिळकतपत्रिका उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरु आहे. स्वामित्व योजनेअंतर्गत समाविष्ट गावांत जमिनींचे ड्रोनद्वारे मोजमाप करण्यात आले. त्यानंतर जिओ टॅगिंग, चौकशी आदी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर गावातील प्रत्येक मालमत्तेचा डिजिटल नकाशा तयार केला जात आहे. उपलब्ध कागदपत्रांच्या पुराव्यानुसार संबंधित मालकाला / शेतकऱ्याला त्याच्या जमीनमालकीचे प्रमाणपत्र (ई-प्रॉपर्टी कार्ड) देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

१८६ गावांतील मिळकतधारकांचे प्रॉपर्टी कार्ड तयार झाले आहेत. प्रॉपर्टी कार्डमुळे मिळकतीचे क्षेत्र, सीमा निश्चित होणार असल्याने ग्रामपंचायतींना करआकारणी करणेही सुलभ होणार आहे. तसेच मिळकतधारकांना देखील कर्ज घेणे, त्यांच्या मिळकतीचे नेमके क्षेत्र किती आहे, तसेच त्याचा नकाशा व सीमा याविषयी माहिती मिळणे सोयीचे होईल. उर्वरित ४४९ गावांतील पीआर कार्ड बनविण्याचे काम प्रगतिपथावर आहे. दरम्यान, ५५८ गावांतील जिओ टॅगिंग आणि चौकशी पूर्ण झाली असून ७७ गावातील ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. स्वामित्व योजने अंतर्गतची सर्व  प्रक्रिया  मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून त्यापूर्वीच जिल्ह्यात हे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा जिल्हा अधीक्षक भूमीअभिलेख शिवाजीराव भोसले यांनी व्यक्त केली.

दरम्यान,  स्थळपाहणी आणि चौकशीचे काम करण्यास चौकशी अधिकाऱ्यांची कमरता असल्याने विभागीय उपसंचालक डॉ.लालसिंग मिसाळ  यांनी बुलढाणा जिल्ह्यातील ६ आणि अकोला जिल्ह्यातील ३ चौकशी अधिकारी उपलब्ध करुन दिले. त्यामुळे कामाला गती प्राप्त झाली आहे.

टॅग्स :washimवाशिम