शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Washim: पोहरादेवीत विश्वस्त मंडळ नेमण्याचे अधिकार सहायक धर्मादाय आयुक्तांना, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

By सुनील काकडे | Updated: September 4, 2023 18:59 IST

Poharadevi: पोहरादेवी येथील श्री देवी सेवादास महाराज संस्थान ट्रस्ट मंदिराचे व्यवस्थापन आणि नवे विश्वस्त मंडळ नेमण्याचा अधिकार वाशिम येथील सहायक धर्मदाय आयुक्तांना असणार आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला.

- सुनील काकडेवाशिम - बंजारा समाज बांधवांची काशी म्हणून जगविख्यात जिल्ह्यातील पोहरादेवी येथील श्री देवी सेवादास महाराज संस्थान ट्रस्ट मंदिराचे व्यवस्थापन आणि नवे विश्वस्त मंडळ नेमण्याचा अधिकार वाशिम येथील सहायक धर्मदाय आयुक्तांना असणार आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. सततच्या पाठपुराव्यास यामुळे यश आल्याची माहिती गोपाल महाराज यांनी ४ सप्टेंबर रोजी दिली.

पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराज आणि श्री जगदंबा मातेचे मंदिर वसलेले आहे. त्याचे व्यवस्थापन श्री देवी सेवादास महाराज संस्थान ट्रस्ट, पोहरादेवी या नावाने असलेल्या न्यासामार्फत चालविले जाते. संत सेवादास महाराजांनी देवीचे मंदीर बांधले असून त्यांच्याच कुटुंबातील रतनसिंग महाराज, धनुसिंग महाराजांनी विश्वस्त म्हणून काम पाहिले. त्यांच्या पश्चात आलासिंग रतनसिंग महाराज आणि हंजारी धनुसिंग महाराजांची विश्वस्त म्हणून नेमणुक झाली.सन १९५३-५४ च्या दरम्यान एका निकालानुसार आलासिंग महाराज आणि हंजारी महाराज या दोन शाखांना वंशपरंपरेने प्रत्येकी एका वर्षासाठी मंदिर व्यवस्थापनाचे अधिकार मिळाले. १२ नोव्हेंबर २०१४ पासून मात्र सहायक धर्मादाय आयुक्तांच्या आदेशाने एक योजना आणि कार्यकारी मंडळ अस्तित्वात आले. ती योजना आणि विश्वस्त मंडळाविरोधात अनेक वर्षे न्यायालयीन लढाई सुरू होती. अखेर २२ ऑगस्ट २०२३ रोजी सदर योजना आणि विश्वस्तमंडळ सर्वोच्च न्यायालयाने एका आदेशान्वये रद्द केले.

या प्रकरणी विद्यमान न्यासाविरोधात संत रामराव महाराज, गोपाल महाराज, रमेश महाराज, संजय महाराज, सिताराम पवार आणि माजी आमदार अनंतकुमार पाटील यांनी अतिरिक्त जिल्हा न्यायालय (लिंक कोर्ट), मंगरूळपीर ते सर्वोच्च न्यायालय, दिल्लीपर्यंत पाठपुरावा केला. त्यास अखेर यश मिळाले असून सहायक धर्मादाय आयुक्तांना महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० मधील तरतुदीनुसार चौकशी करूनच नवे विश्वस्तमंडळ आणि नव्या योजनेला मंजुरी द्यावयाची आहे, असे निर्णयात नमूद आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल बंजारा समाजासाठी ऐतिहासिक ठरणारा आहे. जुनी आणि नवी योजना न्यायालयाने रद्द केल्याने कोणाही एका गटाचा आता मंदिर व्यवस्थापनावर हक्क राहिलेला नाही. दोन्हीही गटांना समान अधिकार सर्वोच्च न्यायालयाने नविन विश्वस्त मंडळ येईपर्यंत प्रदान केले आहे.- गोपाल महाराज, पोहरादेवी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय मान्य करावाच लागेल. मात्र, त्याचा वेगळा अर्थ कुणी लावू नये. आता सहायक धर्मादाय आयुक्त कशाप्रकारे विश्वस्त मंडळ गठीत करतात, याप्रकरणी नेमकी कोणती भूमिका घेतली जाते, त्याची प्रतीक्षा आहे.- महंत कबीरदास महाराज, पोहरादेवी

टॅग्स :washimवाशिमSupreme Courtसर्वोच्च न्यायालय