शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : पोलीस प्रशासनाच्या 'सेवां'ना मिळणार ऑनलाईनची जोड !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 14:14 IST

वाशिम : राज्य शासनाच्या महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कायद्यानुसार गृह विभागाशी संबंधित १७ सेवांना ऑनलाईनची जोड दिली जाणार आहे. नागरिकांनी यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी केले.

ठळक मुद्देगृह विभागाशी संबंधित १७ सेवांना ऑनलाईनची जोड दिली जाणार आहे. या सेवा पोलीस दलातर्फे ऑनलाईन पुरविण्यात येणार आहेत. या सुविधांमुळे कामात एकसूत्रता येणार असून पोलिसांचा व नागरिकांचा वेळही वाचेल.

वाशिम : राज्य शासनाच्या महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कायद्यानुसार गृह विभागाशी संबंधित १७ सेवांना ऑनलाईनची जोड दिली जाणार आहे. नागरिकांनी यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी केले.महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कायद्यानुसार अधिसूचित केलेल्या सेवांमध्ये पोलीस चारित्र्य प्रमाणपत्र, तक्रारदारास प्रथम खबरी अहवालाची (एफआयआर)ची प्रत पुरविणे, ध्वनीक्षेपकाचा (लाऊडस्पीकरचा) परवाना देणे, मनोरंजनाच्या कार्यक्रमांना नाहरकत परवाना देणे, सभा-संमेलने, मिरवणूक, शोभायात्रा इत्यादींना परवाने देणे, विदेशी नागरिकांचे नागरिकत्वाचे प्रस्ताव केंद्र शासनास पाठविणे, पारपत्र पडताळणीसाठी नाहरकत प्रमाणपत्र देणे, पेट्रोलपंप, गॅस एजन्सी, हॉटेल, बार, इत्यादीकरिता नाहरकत प्रमाणपत्र देणे, शस्त्र परवानासाठी नाहरकत प्रमाणपत्र देणे, कागदपत्रे साक्षांकित करणे आदी १७ सेवांचा समावेश आहे. या सेवा पोलीस दलातर्फे ऑनलाईन पुरविण्यात येणार आहेत. या सुविधांमुळे कामात एकसूत्रता येणार असून पोलिसांचा व नागरिकांचा वेळही वाचेल, असा दावा पोलीस प्रशासनाने केला. सदर सुविधा ऑनलाईन उपलब्ध करण्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या आदेशानुसार सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, जिल्हा विशेष शाखेचे प्रभारी अधिकारी व सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व गोपनीय शाखेचे काम पाहणारे सर्व कर्मचारी यांना महाऑनलाईनमार्फत जिल्हा समन्वयक सागर भुतडा यांच्यामार्फत प्रशिक्षणही देण्यात आले.ऑनलाईन सेवांमध्ये विलंब झाल्यास अथवा अर्ज फेटाळला गेल्यास अपील करण्याची संधी मिळणार आहे. या सुविधा ऑनलाईन असल्याने प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी नागरिकांना रांगा लावण्याची किंवा संबंधित कार्यालयात वारंवार फेऱ्या मारण्याची गरज नाही. www.aaplesarkar.mahaononline.gov.in या पोर्टलला भेट दिल्यानंतर आपल्याला आवश्यक सेवांसाठी अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे याविषयी माहिती मिळणार आहे. विशिष्ट निर्धारित कालावधीत हवे असलेले प्रमाणपत्र नागरिकांना प्राप्त होणार आहे. उपरोक्त १७ सेवांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी फक्त ऑनलाइन स्वरुपातच अर्ज सादर करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक पाटील यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमPoliceपोलिस