शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

Washim: ई-केवायसी, आधार सिडिंग न केलेले पीएम किसानचे लाभार्थी होणार अपात्र

By दिनेश पठाडे | Updated: June 23, 2023 16:12 IST

PM Kisan: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थींना वारंवार संपर्क करुनही ई-केवायसी आणि बँक खाते आधारशी संलग्न करण्यास दिरंगाई केली.

- दिनेश पठाडेवाशिम : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थींना वारंवार संपर्क करुनही ई-केवायसी आणि बँक खाते आधारशी संलग्न करण्यास दिरंगाई केली. अशा लाभार्थींची शासन दप्तरी नोंद घेऊन पीएम किसान पोर्टलवर अपात्र मार्क केले जाणार असून अशा लाभार्थीना योजनेतून बाद केले जाणार आहे. 

पी.एम. किसान योजनेंतर्गत वर्षाकाठी पात्र लाभार्थींना सहा हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. तीन टप्प्यात प्रत्येकी दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात वर्ग होतात. योजनेचे आतापर्यंत १३ हप्ते वर्ग करण्यात आले आहेत. योजनेत अधिक पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. पी.एम किसानच्या नोंदणीकृत लाभार्थींना राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा देखील लाभ मिळणार आहे. सद्यस्थितीत ई-केवायसी व बँक खाती आधार संलग्न करण्याचे काम चालू आहे. ही कामे करताना क्षेत्रिय स्तरावर मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत.

तसेच ज्या पात्र लाभार्थींना वारंवार संपर्क करुनही ई-केवायसी व बँक खाती आधार संलग्न केलेली नाही. अशा लाभार्थींची नोंद घेऊन पोर्टलवर अपात्र करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुषंगाने तहसील, जिल्हा स्तरावर ज्या पात्र लाभार्थींना वारंवार संपर्क करुनही उपरोक्त प्रक्रिया पूर्ण न केलेले आणि मयत लाभार्थी यांना पी.एम. किसान पोर्टलवर अपात्र मार्क करण्यासाठी क्षेत्रीय स्तरावरुन याद्या सादर केल्या आहेत. या याद्यांवर २६ जूनपूर्वी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना पी.एम किसान योजनेचे उपआयुक्त (कृषी गणना) तथा पथक प्रमुख दयानंद जाधव यांनी २२ जून रोजी सर्व नोडल अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.  

१५.४२ लाख लाभार्थींचे केवायसी शिल्लकराज्यात पी.एम. किसान योजनेचे ९९ लाख ५ हजार ७०५ सक्रिय लाभार्थी आहेत. २२ जूनपर्यंत ८३ लाख ६२ हजार ८४३ लाभार्थींनी केवायसी पूर्ण केले आहे. तर १५ लाख ४२ हजार ८६२ लाभार्थींचे केवायसी  प्रलंबित आहे.

९.७१ लाख लाभार्थीचे आधार सिडिंग प्रलंबितराज्यातील ९६ लाख ५४ हजार ७७३ लाभार्थींपैकी ८६ लाख ४० हजार २५९ शेतकऱ्यांनी आधार सिडिंग पूर्ण केले आहे.  ९ लाख ७१ हजार ५२२ लाभार्थींचे बँक खाते आधार संलग्न करणे शिल्लक आहे.

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाwashimवाशिम