शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम: कोरोनाविरूद्ध लढ्यास पॅरामेडिकल स्टाफ सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 11:11 IST

पॅरामेडिकल स्टाफच्या मदतीला गटप्रवर्तक, अंगणवाडी सेविकांनाही घेण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणूच्या जिल्ह्यातील ३ एप्रिल रोजीच्या प्रवेशानंतर संपूर्ण आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द केल्या असून, पॅरामेडिकल स्टाफच्या मदतीला गटप्रवर्तक, अंगणवाडी सेविकांनाही घेण्यात आले आहे.कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या असून, आरोग्य यंत्रणा कुठे कमी पडू नये म्हणून आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागातील आरोग्य अधिकारी, कर्मचाºयांना मुख्यालयी राहण्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी यापूर्वीच दिला आहे. जिल्हा परिषद कोरोना नियंत्रण कक्ष स्थापन केला असून तेथून या सर्व स्टाफचे नियंत्रण केले जात आहे. आशा स्वयंसेविका ९७६, गट प्रवर्तक ४८, अंगणवाडी सेविका १०७६, आरोग्य सेवक व सेविका १६५४, वैद्यकीय अधिकारी ३५० या स्टाफच्या भरवशावर जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा ग्रामीण भागात तळ ठोकून आहे. मेडशी येथील परिस्थितीत सुधारणा आहे.

वैद्यकीय अधिकारी आरोग्य केंद्रातजिल्ह्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण हा ग्रामीण भागातील असल्याने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रावर लक्ष केंद्रीत करीत सर्व अधिकारी, कर्मचाºयांना मुख्यालयी राहण्याचा आदेश दिला. मेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने मेडशीत तपासणी केली असून, सर्वांची प्रकृती ठणठणीत असल्याचा दावा आरोग्य विभागाने केला. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात आवश्यक त्या औषधीचा साठा उपलब्ध करण्यात आला आहे, असे जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती चक्रधर गोटे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी १० एप्रिल रोजी सांगितले.अंगणवाडी सेविकाही दिमतीलागावोगावी सर्वे करणे, कोरोना विषाणू संसर्गासंदर्भात आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला नागरिकांना देण्याकामी अंगणवाडी सेविका, गट प्रवर्तक, आशा स्वयंसेविकांची मदत घेण्यात आली आहे. या कर्मचाºयांना मास्क, सॅनिटायझर व आरोग्य सुविधा उपलब्ध केल्या तसेच आणखी आरोग्य सुविधा पुरविण्यात येतील, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

टॅग्स :washimवाशिमCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस