शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : ‘शाळा सिद्धी’ उपक्रमांतर्गत शाळांचे बाहय़ मुल्यमापन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 01:28 IST

वाशिम : ‘शाळा सिद्धी’ या शालेय विभागाच्या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत स्वत:च्या शाळांचे स्वयंमुल्यमापन करणार्‍या जिल्ह्यातील १३७२ शाळांच्या बाह्य मुल्यांकन प्रक्रियेस येथील शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत बुधवार, ७ फेब्रुवारीपासून प्रारंभ झाला. माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. ज्ञानेश्‍वर नागरे यांनी यावेळी उपस्थित मुख्याध्यापकांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

ठळक मुद्दे१३७२ शाळांच्या मुख्याध्यापकांचा सहभाग शाळा सुधारणेवर दिला जाणार अधिक भर

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ‘शाळा सिद्धी’ या शालेय विभागाच्या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत स्वत:च्या शाळांचे स्वयंमुल्यमापन करणार्‍या वाशिम जिल्ह्यातील १३७२ शाळांच्या बाह्य मुल्यांकन प्रक्रियेस येथील शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत बुधवार, ७ फेब्रुवारीपासून प्रारंभ झाला. माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. ज्ञानेश्‍वर नागरे यांनी यावेळी उपस्थित मुख्याध्यापकांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले.शाळांचा गुणात्मक दर्जा वाढविणे, सर्वांगीण सुधारणा यासह इतर महत्वपूर्ण निकषांवर आधारित ‘शाळा सिद्धी’ या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या व खासगी १0२७ प्राथमिक शाळा, १७0 विद्यालय, १६७ उच्च माध्यमिक विद्यालय, ५ समाजकल्याणच्या शाळा, नवोदय विद्यालय, सैनिक शाळा अशा एकूण १३७२ शाळांनी शालेय विभागाच्या दिशानिर्देशानुसार आपापल्या शाळांचे स्वयंमुल्यमापन केले. त्यात ठरवून दिलेल्या ए, बी, सी ग्रेडनुसार ‘ए’ ग्रेडमध्ये ३१९, ‘बी’ ग्रेडमध्ये ८५३ आणि ‘सी’ ग्रेडमध्ये ९८ शाळांचा समावेश झाला. १0२ शाळांनी या प्रक्रियेत सहभागच घेतला नाही. दरम्यान, आता स्वयंमुल्यमापन करणार्‍या शाळांचे बाह्य मुल्यांकन करण्यात येत असून त्यासाठी जिल्ह्यातील एका तालुक्यातील शाळांची जबाबदारी दुसर्‍या तालुक्यांमधील मुख्याध्यापकांवर सोपविण्यात आली. यामाध्यमातून मुल्यमापन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पुन्हा संबंधित सर्व शाळांना गुण दिले जातील, अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. नागरे यांनी दिली. 

टॅग्स :washimवाशिम