शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : विविध मागण्यांसाठी आयटक संघटना आक्रमक; १७ जानेवारीला कामगारांचा मोर्चा! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 19:16 IST

वाशिम : बांधकाम कामगारांसह इतर कामगारांच्या प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेसाठी आयटक संघटनेने  आक्रमक पावित्रा घेतला असून, शासन-प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी १७ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले आहे. यासंदर्भात बुधवारी जिल्हाधिकार्‍यांमार्फत शासनाकडे निवेदन पाठविण्यात आले.

ठळक मुद्देजिल्हाधिकार्‍यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : बांधकाम कामगारांसह इतर कामगारांच्या प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेसाठी आयटक संघटनेने  आक्रमक पावित्रा घेतला असून, शासन-प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी १७ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले आहे. यासंदर्भात बुधवारी जिल्हाधिकार्‍यांमार्फत शासनाकडे निवेदन पाठविण्यात आले.१७ जानेवारी रोजी स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानापासुन या मोर्चाची सुरूवात होणार आहे. मोर्चाचे नेतृत्व महाराष्ट्र बांधकाम कामगार फेडरेशनचे राज्य सरचिटणीस संजय मंडवधरे, बांधकाम कामगार संघटना जिल्हाध्यक्ष कॉ. शेख सईद शेख हमजा हे करणार आहेत. ४५ व्या भारतीय श्रम संमेलनाच्या शिफारशीनुसार सर्व प्रकल्प कामगारांना कर्मचाºयांचा दर्जा द्यावा, आरोग्य सुविधा व तीन हजार रुपये पेन्शन लागु करावे, किमान वेतन १८ हजार रुपये महिना देण्यात यावा, प्रकल्प योजनेत अर्थसंकल्पीय कपात करू नये, २०१८-१९ च्या अर्थसंकल्पात प्रकल्प कामगारांसाठी योग्य तरतुद करुन वाढ करण्यात यावी, प्रकल्प योजनांचे खाजगीकरण बंद करावे, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात सर्व बांधकाम कामगारांची नोंदणी करावी, बांधकाम कामगारांना घरे देण्यात यावी, आदी मागण्या प्रलंबित आहेत. याकडे लक्ष वेधण्यासाठी देशव्यापी संप पुकारण्यात येणार आहे. या अनुषंगाने वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर १७ जानेवारीला मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चात जिल्ह्यातील बांधकाम कामगार, आशा स्वयंसेविका, मध्यान्ह भोजन कामगार, अंगणवाडी सेविका, मदतनिस, ग्रामरोजगार सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी व सर्व प्रकल्प कामगार व असंघटीत कामगार आदींची उपस्थिती राहणार आहे. संघटनेचे डिगांबर अंभोरे, आशा स्वयंसेविका संघटनेच्या जिल्हाध्यक्षा चित्रा भगत, अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या जिल्हाध्यक्षा सविता इंगळे, लाल बावटा शेतमजूर युनियनचे जिल्हा संघटक संजय बाजड, महाराष्ट्र राज्य किसान सभेचे जिल्हा सचिव रमेश मुंजे, शालेय पोषण आहार संघटनेच्या जिल्हाध्यक्षा अनुराधा काळे, मंगरुळपीर तालुका अध्यक्षा बेबी भगत, ग्रामरोजगार सेवक संघटनेचे जिल्हा सचिव रमेश खिल्लारे, बांधकाम कामगार संघटनेचे मानोरा तालुका अध्यक्ष अब्दुल सलाम शेख इब्राहीम, वाशिम तालुका संघटक जगजीवन मनवर, वाशिम शहर अध्यक्ष उमेश बन्सोड, कारंजा तालुका अध्यक्ष तारेक फारुकी, मालेगाव तालुका संघटक संतोष खराबे, रिसोड तालुका संघटक  पद्माकर लांडगे यांनी प्रलंबित मागण्यांसंदर्भात आक्रमक पावित्रा घेतला आहे.

टॅग्स :washimवाशिमagitationआंदोलन