शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : दुर्धर आजारग्रस्त रुग्णांसाठी केवळ १२ लाखांचा निधी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 01:50 IST

वाशिम : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची दुर्धर आजारग्रस्त रुग्णांना १५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यासाठी केवळ १२ लाख रुपयांचा निधी असल्याने लाभार्थींना लाभ देताना दमछाक होत आहे. गतवर्षी हाच निधी २२ लाख रुपये असा होता.

ठळक मुद्देआरोग्य विभागाची दमछाक १५ हजारांचे अर्थसाहाय्य

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची दुर्धर आजारग्रस्त रुग्णांना १५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यासाठी केवळ १२ लाख रुपयांचा निधी असल्याने लाभार्थींना लाभ देताना दमछाक होत आहे. गतवर्षी हाच निधी २२ लाख रुपये असा होता.नानाविध कारणांमुळे मानवाला विविध प्रकारचे दुर्धर आजार जडत आहेत. गोरगरीब रुग्णांना कर्करोग, हृदयरोग, किडनीचा विकार यांसारख्या दुर्धर आजारांवरील उपचाराचा खर्च झेपावणारा नसल्याने शासनाने सरकारी दवाखान्यांची सुविधा उपलब्ध केली. याबरोबरच गोरगरीब रुग्णांना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून १५ हजारांचे आर्थिक साहाय्यदेखील दिले जाते. राज्य शासनाने नमूद केलेल्या रुग्णालयात उपचार घेतलेल्या कर्करोग, हृदयरोग व किडनीग्रस्त रुग्णांनी प्रस्ताव सादर केल्यानंतर साधारणत: एका महिन्याच्या आत या प्रस्तावाची पडताळणी आणि मंजुरात या प्रशासकीय बाबी पूर्ण होतात. त्यानंतर संबंधित रुग्णांना उपचारासाठी १५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते.  जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात या भरीव निधीची तरतूद केल्या जाते. दुर्धर आजाराने पीडित रुग्णांना आर्थिक मदत देणे या लेखाशीर्षाखाली सन २0१४-१५ मध्ये ३0 लाख रुपये निधीची तरतूद होती. सन २0१५-१६ या वर्षात २४.४५ लाख, सन २0१६-१७ या वर्षात २२ लाख अशी तरतूद होती. सन २0१७-१८ या वर्षात केवळ १२ लाख रुपयांची तरतूद आहे. अल्प निधीचा आता आरोग्य विभागाला फटका बसत असल्याचे दिसून येते. दुर्धर आजारग्रस्त रुग्णांसाठी पुरेशा प्रमाणात निधी मिळावा, यासाठी पाठपुरावा सुरू आहे, असे जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती सुधीर पाटील गोळे यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमHealthआरोग्य