शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
4
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
5
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
6
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
7
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
8
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
9
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
10
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
11
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
12
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
13
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
14
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
15
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
16
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
17
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
18
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
19
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप
20
अहमदाबाद विमानतळावर मोठी कारवाई, इस्लामिक स्टेटचे ४ दहशतवादी पकडले, श्रीलंकेचे कनेक्शन उघड

वाशिम जिल्ह्यात उडिद, मुगाची बेभाव खरेदी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 3:43 PM

अगदी नगण्य दर मिळत असल्याने शेतकरी संकटात असताना शासनाने हमीभावाने खरेदीसाठी शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याची तसदी अद्याप घेतली नाही.

शासकीय खरेदी केंद्रांची प्रतिक्षा: शेतकºयांची पिळवणूक लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: खरीपातील कमी कालावधीची पिके असलेल्या उडिद, मुगाची आवक बाजारात सुरू झाली आहे. तथापि, या शेतमालास अगदी नगण्य दर मिळत असल्याने शेतकरी संकटात असताना शासनाने हमीभावाने खरेदीसाठी शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याची तसदी अद्याप घेतली नाही. जिल्ह्यातील कारंजा बाजार समितीच्यावतीने शासकीय खरेदी कें द्र सुरू करण्याच्या मागणीचे पत्रही जिल्हा उपनिबंधकांना पाठविले आहे. यंदाच्या हंगामात आॅगस्टमधील अतिपावसामुळे उडिद आणि मुग पिकांचे उत्पादनही घटले. जिल्ह्यात १०२३३ हेक्टर क्षेत्रावर मुग, तर १४१२४ हेक्टर क्षेत्रावर मुगाची पेरणी झाली होती. जुन आणि जुलै महिन्यात पडलेल्या पावसामुळे या पिकांची स्थिती सुधारल्याने शेतकºयांना या पिकांपासून चांगल्या उत्पादनाचीही अपेक्षा होती.  यंदा शासनाने मुगासाठी ६९७५, तर उडिदासाठी ५६०० रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केल्याने शेतकºयांत समाधानही होते; परंतु बाजारात या शेतमालास अगदीच नगण्य भाव मिळत आहेत. शुक्रवारी बाजाराची स्थिती पाहिली असता कारंजा बाजार समितीत अधिकाधिक ४४००, मंगरुळपीर बाजार समितीत ५७०० रुपये, तर मानोरा बाजार समितीत ५००० रुपये प्रति क्ंिवटलने शेतकºयांकडून मुगाची खरेदी सुरू करण्यात आली. याच दिवशी कारंजा बाजार समितीत उडिदाची प्रति क्विंटल ४४५०, मंगरुळपीर येथे ४२५० रुपये, तर मानोरा येथे ५२०० रुपये प्रति क्विंटलने शेतकºयांकडून खरेदी करण्यात आली. अर्थात बाजार व्यवस्था स्वत:च्या सोयीनेच शेतमालाचा दर निश्चित करीत असल्याचे दिसते. ही शेतकºयांची चक्क फसवणूक असताना प्रशासन मात्र काहीच करताना दिसत नाही. शेतकºयांची लूट थांबविण्यासाठी शासकीय खरेदी केंद्र तातडीने सुरू करण्याची गरज असताना त्याचीही तसदरी अद्याप घेण्यात आली नाही.  कारंजा बाजार समितीने केली मागणीबाजारात उडिद, मुगाला हमीभावापेक्षा खूप कमी दर मिळत आहेत. त्यामुळे शेतकरी संकटात असताना कारंजा बाजार समितीने जिल्हा उपनिबंधक व जिल्हाधिकाºयांना गत आठवड्यात पत्र सादर करून कारंजात उडिद, मुगाच्या खरेदीसाठी शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केली; परंतु अद्याप त्याची दखल घेण्यात आलेली नाही.

टॅग्स :washimवाशिमMarket committee washimबाजार समिती वाशिम