शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : भावाचा जीव वाचविण्यासाठी बाहिणीने केले ‘किडनीदान’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 00:38 IST

प्राचीन काळापासून बहिण-भावाच्या नात्याची महती वर्णीली जाते. वाशिम तालुक्यातील भट उमरा या गावातील एका बहिणीने भावासाठी किडनी देऊन बहिण-भावाचं नातं किती सर्वश्रेष्ठ आहे, याची प्रचिती दिली. देवकाबाई श्रीराम वानखेडे असे बहिणीचे नाव असून, डॉ. दामोदर रामजी काळे असे भावाचे नाव आहे. 

ठळक मुद्देवाशिम तालुक्यातील भट उमरा येथील काळे परिवाराचा मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : प्राचीन काळापासून बहिण-भावाच्या नात्याची महती वर्णीली जाते. वाशिम तालुक्यातील भट उमरा या गावातील एका बहिणीने भावासाठी किडनी देऊन बहिण-भावाचं नातं किती सर्वश्रेष्ठ आहे, याची प्रचिती दिली. देवकाबाई श्रीराम वानखेडे असे बहिणीचे नाव असून, डॉ. दामोदर रामजी काळे असे भावाचे नाव आहे. वाशिम तालुक्यातील भट उमरा येथील रहिवाशी व वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा माजी जिल्हा परिषद सदस्य, शेतकरी नेते डॉ. दामोदर रामजी काळे यांना जून २0१७ पासून किडनीच्या दूर्धर आजाराने ग्रासले होते. अकोला व औरंगाबाद येथील खासगी हॉस्पिटलमधील उपचाराअंती किडनी प्रत्यारोपन हाच एकमेव पर्याय असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तेव्हा काळे कुटुंबीयांनी किडनी उपचार व प्रत्यारोपनासाठी गुजरात राज्यातील एका युरॉलॉजीकल हॉस्पीटल येथे डॉ. काळे यांना दाखल केले. यावेळी डॉ. काळे यांची कनिष्ठ बहिणी पार्डी आसरा येथील निवासी देवकाबाई वानखेडे यांनी स्वत:ची किडनी भावाला देण्यासाठी पुढाकार घेतला. गुजरातमधील नडियाद येथील हॉस्पीटलमध्ये डॉ. उमापती हेगडे व डॉ. राजापूरकर या डॉक्टरांनी दोन्ही भावा-बहिणीवर यशस्वी शस्त्रक्रिया करीत किडनी प्रत्यारोपन करण्यात महत्वाची भूमिका बजावली. सुरुवातीला काही दिवस डॉ. दामोदर काळे यांना सातत्याने व्हेंटीलेंटरवर रहावे लागले. सध्या दोन्ही बहिण-भावाची प्रकृती उत्तम असून माझी बहीणच माझ्यासाठी ईश्‍वर असून आपल्याला तिचा सार्थ अभिमान असल्याचे डॉ. दामोदर काळे यांनी सांगीतले. देवकाबाई यांनी घेतलेल्या निर्णयाचे जिल्ह्याभरात सर्व समाजस्तरातून स्वागत व कौतुक होत आहे. देवकाबाई वानखेडे यांची प्रेरणा घेऊन मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प काळे कुटुंबीयांनी केला असल्याचे डॉ. दामोदर काळे यांचे चिरंजीव डॉ. विजय काळे यांनी सांगीतले.

टॅग्स :washimवाशिमHealthआरोग्य