शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
7
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
8
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
9
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
10
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
11
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
12
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
13
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
14
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
15
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
16
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
17
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
18
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
19
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
20
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार

वाशिम : प्रजासत्ताक दिनी ग्रामसभा न घेणारे ग्रामसेवक ‘रडार’वर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 02:18 IST

वाशिम:  राष्ट्रीय सण, उत्सवांच्या दिवशी ग्रामसभा न घेता ती इतरत्र दिवशी घेण्यात यावी, असा पवित्रा घेऊन जिल्हय़ातील ग्रामसेवकांनी प्रजासत्ताक दिनी अर्थात २६ जानेवारीच्या ग्रामसभेवर बहिष्कार टाकला. याप्रकरणी ‘लोकमत’ने २८ जानेवारीच्या अंकात सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. दरम्यान, ज्या ग्रामसेवकांनी ग्रामसभा घेतली नाही, त्यांच्यावर नियमानुसार शिस्तभंगाची कार्यवाही केली जाईल, असे सूतोवाच जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने यांनी सोमवारी केले. यासंदर्भात जिल्हय़ातील सर्वच ग्रामपंचायतींची चौकशीदेखील सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देजि.प.च्या पंचायत विभागाचे सूतोवाच जिल्हय़ातील सर्वच ग्रामपंचायतींच्या चौकशीस प्रारंभ

सुनील काकडे । लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम:  राष्ट्रीय सण, उत्सवांच्या दिवशी ग्रामसभा न घेता ती इतरत्र दिवशी घेण्यात यावी, असा पवित्रा घेऊन जिल्हय़ातील ग्रामसेवकांनी प्रजासत्ताक दिनी अर्थात २६ जानेवारीच्या ग्रामसभेवर बहिष्कार टाकला. याप्रकरणी ‘लोकमत’ने २८ जानेवारीच्या अंकात सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. दरम्यान, ज्या ग्रामसेवकांनी ग्रामसभा घेतली नाही, त्यांच्यावर नियमानुसार शिस्तभंगाची कार्यवाही केली जाईल, असे सूतोवाच जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने यांनी सोमवारी केले. यासंदर्भात जिल्हय़ातील सर्वच ग्रामपंचायतींची चौकशीदेखील सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.२६ जानेवारी, १ मे, १५ ऑगस्ट आणि २ ऑक्टोबर या राष्ट्रीय सण, उत्सवांच्या दिवशी सार्वजनिक सुटी येत असल्याने ग्रामसेवक वगळता इतर विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे या दिवशी ग्रामसभा न घेता त्या अन्य दिवशी घेण्यात याव्या, अशी मागणी करून महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने २६ जानेवारीच्या ग्रामसभेवर बहिष्कार टाकला होता. वाशिम जिल्हय़ातील ग्रामसेवकांनीही संघटनेतील वरिष्ठांच्या आदेशानुसार ग्रामसभांकडे पाठ फिरवली. यादरम्यान, सरपंच संघटनेने पुढाकार घेत काही ठिकाणी ग्रामसभांचे आयोजन केले; परंतु अपेक्षित कोरमअभावी आणि ‘प्रोसेडिंग’ लिहिण्यात उद्भवलेल्या अडचणींमुळे त्यास यश मिळू शकले नाही. एकूणच या सर्व समस्यांमुळे शासन नियम असतानाही २६ जानेवारीला केवळ ग्रामसेवकांच्या आडमुठे धोरणामुळे कुठेच ग्रामसभा होऊ शकली नाही. पर्यायाने ग्रामविकासाला बाधा निर्माण झाली. याप्रकरणी संबंधित ग्रामसेवकांवर प्रशासनाकडून काय कार्यवाही होते, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.

२६ जानेवारी या राष्ट्रीय सणाच्या दिवशी ग्रामसभा घेण्याचा नियम शासनस्तरावरूनच घालून देण्यात आला आहे. त्याचे पालन करणे प्रत्येक ग्रामसेवकास बंधनकारक आहे. या दिवशी गावपातळीवरील इतर विभागांच्या प्रशासकीय कर्मचार्‍यांनाही सुटी राहत असल्याने तेदेखील ग्रामसभेला उपस्थित राहू शकतात; मात्र शासनाकडून कुठलाही निर्णय झाला नसताना जिल्हय़ातील ग्रामसेवकांनी आपल्या कार्यक्षेत्रात ग्रामसभा न घेणे, हा नियमाचा भंग असून याप्रकरणी सखोल चौकशी करून ग्रामसभा न घेणार्‍या ग्रामसेवकांवर निश्‍चितपणे शिस्तभंगाची कार्यवाही प्रस्तावित केली जाईल.- नितीन मानेउपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत विभाग, जिल्हा परिषद

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतwashimवाशिम