शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

वाशिम : अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वारकऱ्यांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 14:45 IST

वाशिम : दरवर्षीप्रमाणे यंदाही संत गजानन महाराजांच्या प्रकटदिन महोत्सवानिमित्त उमरा कापसे येथून शेगावला निघालेल्या चार वारकऱ्यांचा बाळापूर-पातूर मार्गावरील बाघ फाट्यानजिक ५ फेब्रुवारीला अपघातात मृत्यू झाला. दरम्यान, ६ फेब्रुवारीला सकाळी त्यातील तीघांवर उमरा येथे; तर एकावर जवळा येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

ठळक मुद्देउमरा कापसे येथून शेगावला निघालेल्या चार वारकऱ्यांचा बाळापूर-पातूर मार्गावरील बाघ फाट्यानजिक ५ फेब्रुवारीला अपघातात मृत्यू झाला. ६ फेब्रुवारीला सकाळी त्यातील तीघांवर उमरा येथे; तर एकावर जवळा येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मृतकांच्या कुटुंबियांसह दोन्हीही गावांमधील ग्रामस्थांना अश्रू आवरणे कठीण झाले होते.

वाशिम : दरवर्षीप्रमाणे यंदाही संत गजानन महाराजांच्या प्रकटदिन महोत्सवानिमित्त उमरा कापसे येथून शेगावला निघालेल्या चार वारकऱ्यांचा बाळापूर-पातूर मार्गावरील बाघ फाट्यानजिक ५ फेब्रुवारीला अपघातात मृत्यू झाला. दरम्यान, ६ फेब्रुवारीला सकाळी त्यातील तीघांवर उमरा येथे; तर एकावर जवळा येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मृतकांच्या कुटुंबियांसह दोन्हीही गावांमधील ग्रामस्थांना अश्रू आवरणे कठीण झाले होते.गेल्या २१ वर्षांपासून सुरू असलेली परंपरा कायम ठेवत उमरा कापसे येथून यंदाही १ फेब्रुवारीला काढण्यात आलेल्या पायदळ वारीत १७० पेक्षा अधिक गजानन भक्तांनी सहभाग नोंदविला होता. मजल-दरमजल करित गजानन महाराजांच्या दर्शनासाठी आतूर झालेल्या वारीतील वारकºयांवर मात्र शेगावला पोहचण्यापूर्वीच काळाने झडप घातली. ५ फेब्रुवारीला बाघ फाट्यानजिक दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास काहीकाळ विसावा घेण्यासाठी थांबलेले असताना भरधाव वेगात येणाºया ट्रकने वारीतील तीनचाकी वाहनास जबर धडक दिली. यात वाहनात बसून असलेले काशिनाथ चंद्रभान कापसे (६५), रमेश धनाजी कापसे (३५), लिलाबाई बळीराम कापसे (५८) सर्व रा. उमरा आणि रामजी नामदेव काकडे (५०) रा. जवळा या चार वारकºयांचा मृत्यू झाला. तसेच बळीराम रामजी कापसे (६५), किसनाबाई साबळे (५५) आणि सारजाबाई काशिनाथ कापसे (५८) हे तिघे गंभीर जखमी झाले.दरम्यान, मृतकांवर मंगळवारी सकाळी अत्यंत शोकाकुल वातावरणात उमरा कापसे आणि जवळा येथे अंत्यंसंस्कार करण्यात आले. यावेळी मृतकांच्या कुटुंबियांसह गावकºयांनी मोठ्या संख्येने सहभाग दर्शवून वारकºयांना अखेरचा निरोप दिला.

 

टॅग्स :washimवाशिमAccidentअपघात