शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

Washim: चार एकरांतील संत्री ६ वर्षे जपली, कमाई न झाल्याने ‘जेसीबी’ने उपटली

By दिनेश पठाडे | Updated: May 8, 2024 17:03 IST

Washim News: पिंपळगाव येथील संत्रा उत्पादक शेतकऱ्याने  चार एकरांतील ६ वर्षे जपलेली संत्री कमाई न झाल्यामुळे जेसीबीने ८ मे रोजी उपटून टाकली. 

- दिनेश पठाडेवाशिम - पिपंळगाव येथील संत्रा उत्पादक शेतकऱ्याने  चार एकरांतील ६ वर्षे जपलेली संत्री कमाई न झाल्यामुळे जेसीबीने ८ मे रोजी उपटून टाकली. संत्रा बागेतून  गेल्यावर्षी बऱ्यापैकी उत्पन्न मिळाले, मात्र यातूनही अपेक्षित कमाई झाली नाही; परंतु अचानक संत्र्याच्या भावात  झालेल्या घसरणीमुळे शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसला. दहा लाख रुपये किमतीची संत्री फक्त अडीच लाख रुपयांमध्ये देण्याची वेळ शेतकऱ्यावर आली. संत्रा बागेतून काहीच उत्पन्न शिल्लक राहत नसल्यामुळे शेतकरी जुबेर खान नूरखान यांनी मोठमोठ्या संत्रा झाडावर जेसीबी चालवला. सहा वर्षे पूर्ण होईपर्यंत झाडांची देखभाल करणे, वेळोवेळी महागडी खते देणे, फवारणी यासाठी लाखो रुपये खर्च करूनदेखील अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. लागवड खर्चही निघत नसेल तर ही संत्रा झाडे न ठेवलेलीच बरी म्हणत लहान मुलांप्रमाणे संगोपन केलेल्या संत्रा बागेवर जेसीबी चालविण्याची वेळ शेतकऱ्यावर आली. कवडीमोल भावात मागणीमृग बहार फुटेल या अपेक्षेने त्यावर खर्च केला जातो; परंतु निसर्गाचा लहरीपणामुळे कित्येकदा बागेत चांगली फूट होत नाही. त्यामुळे पूर्ण वर्ष खाली जाते अन् चांगली फूट झालीच तर लाखो रुपयांच्या संत्रा बागेला व्यापाऱ्यांकडून कवडीमोल भावात मागितले जाते. त्यामुळे या दुहेरी असमतोलामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक गणित पूर्णतः बिघडते. सर्व्हे क्र. ७४ मध्ये दहा वर्षांआधी चार एकर क्षेत्रात पाचशे संत्रा झाडे लावली होती. सहा वर्षे होईपर्यंत त्याचे चांगले संगोपन केले. पंधरा फूट एवढ्या उंचीची डोलदार झाडे बनली; परंतु गेल्या चार वर्षंपासून लावलेला खर्च देखील निघत नसल्यामुळे सर्व झाडे जेसीबीच्या साहाय्याने काढून टाकायचा निर्णय घेतला. जुबेरखान नूरखान- शेतकरी, पिंपळगाव बु.

टॅग्स :washimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी