शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम :  जिल्ह्यात विनापरवानगी प्रवेश केल्यास गुन्हा दाखल होणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 17:34 IST

जिल्हा प्रवेशासाठी पोलीस प्रशासनाची परवानगी बंधनकारक

वाशिम : जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला एकमेव रुग्ण आढळून आला आहे. मात्र, यापुढील काळात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, याकरिता जिल्ह्यात संचारबंदी व जिल्हाबंदी आदेशाची अतिशय कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने १५ एप्रिल रोजी घेतला. संचारबंदी व जिल्हाबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करून, रीतसर पूर्वपरवानगी न घेता जिल्ह्यात येणाºया व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याचा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिला.जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी, या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी व जिल्हा बंदी आदेशाची अतिशय कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यापुढे राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील व्यक्तीला वाशिम जिल्ह्यात प्रवेश करावयाचा असल्यास, त्यांनी ते सध्या ज्या जिल्ह्यात आहेत, तेथील पोलीस उपायुक्त अथवा पोलीस अधीक्षक यांची रीतसर परवानगी आणणे आवश्यक आहे. विना परवानगी कोणत्याही व्यक्तीला जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार नाही. तसेच इतर कोणत्याही मार्गांनी विना परवानगी जिल्ह्यात प्रवेश केलेल्या व्यक्तींना जिल्ह्याबाहेर काढून त्यांच्यावर कलम १८८ व साथरोग प्रतिबंध अधिनियम १८९७ नुसार गुन्हे दाखल करण्याचा आदेश जिल्हाधिकाºयांनी दिला. 

अत्यावश्यक कारणासाठीच मिळणार परवानगीकेवळ वैद्यकीय व अत्यावश्यक कारणासाठीच जिल्ह्याबाहेर अथवा राज्याबाहेर जाण्याची परवानगी देण्याच्या सूचना शासनाने दिल्या असून अशी परवानगी देण्याचे अधिकार राज्याचे पोलीस महासंचालक आणि संबंधित जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले आहेत. राज्यातील इतर जिल्ह्यातून वैद्यकीय अथवा अत्यावश्यक कारणासाठी वाशिम जिल्ह्यात येवू इच्छिणाºया व्यक्तींनी ते सध्या ज्या जिल्ह्यात आहेत, तेथील पोलीस उपायुक्त अथवा जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडून रीतसर परवानगी घेणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त कोणत्याही विभागाने, अधिकाºयांनी दिलेली परवानगी ग्राह्य धरण्यात येणार नाही.

संकेतस्थळावर आॅनलाईन अर्ज करावाअत्यावश्यक कारणासाठी महाराष्ट्रातून बाहेर राज्यात जाणाºया व्यक्तींनी ‘कोवीड-१९ डॉट महापोलीस डॉट इन’ या संकेतस्थळावर जावून पोलीस महासंचालक कार्यालयाकडे आॅनलाईन अर्ज करावा. या कार्यालयातील विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) यांना अशी परवानगी देण्यासाठी नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तसेच वाशिम जिल्हयांतर्गत प्रवासासाठी परवानगीकरिता सुद्धा या पोर्टलद्वारे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे अर्ज करता येईल. मात्र, वाशिम जिल्ह्यातील नागरिकांना अत्यावश्यक कारणासाठी जिल्ह्याच्या बाहेर जाणे आवश्यक असल्यास याबाबतची रीतसर परवानगी घेण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे अर्ज करणे आवश्यक आहे. तसेच बाहेर जिल्ह्यातून परत वाशिम जिल्ह्यात येण्यासाठी संबंधित जिल्हा पोलीस अधीक्षक यांची रीतसर परवानगी घेणे आवश्यक आहे.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या