शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

वाशिम जिल्ह्यात ६३८६ घरकुलांची कामे अपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 19:31 IST

Washim News : पंतप्रधान आवास योजनेतील २ हजार २३४ लाभार्थ्यांना अद्यापही २ रा व ३ रा हप्ता मिळालेला नाही.

वाशिम : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जवळपास ६३८६ घरकुलांची कामे अपूर्ण असून, अनुदानही रखडले आहे. याप्रकरणी आक्रमक पवित्रा घेत अनुदान तातडीने देण्याची मागणी राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी गुरूवारी केली.बेघर लाभार्थ्यांना हक्काचे घर देण्यासाठी शासनाकडून रमाई आवास, पंतप्रधान आवास, शबरी आवास आदी योजना राबविण्यात येतात. परंतु अद्यापही जिल्हयातील पात्र व गरजु लाभार्थी घरकुल योजनेपासुन वंचित आहेत. त्यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्याकडे तक्रारी कराव्यात व तक्रारीच्या झेराक्सची प्रत आमच्याकडे सादर करावी, वंचितांना हक्काचे घरकुल देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करु वेळप्रसंगी लढा उभारु, असेही चंद्रकांत ठाकरे म्हणाले. जिल्हयात पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ८ हजार ९४६ घरकुले मंजुर आहेत. त्यापैकी ५ हजार ८०१ घरकुल पुर्ण झालेली आहेत. रमाई आवास योजनेंतर्गत ७ हजार १६६ घरकुले मंजुर असुन त्यापैकी ४ हजार ११२ घरकुले पुर्ण झालेली आहेत. तर शबरी आवास योजनेंतर्गत ४८३ घरकुले मंजुर असून २९६ घरकुलेच पुर्ण आहेत. पंतप्रधान आवास योजनेतील २ हजार २३४ लाभार्थ्यांना अद्यापही २ रा व ३ रा हप्ता मिळालेला नाही. रमाई योजनेतील २ हजार लाभार्थ्यांना देखील २ रा व ३ रा हप्ता मिळालेला नाही. तसेच शबरी योजनेतर्गत १०६ लाभार्थ्यांना २ रा व ३ रा हप्ता मिळाला नसल्यामुळे एैन पावसाळयाच्या दिवसात त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देण्याची मागणीही ठाकरे यांनी केली. 

टॅग्स :washimवाशिमgovernment schemeसरकारी योजना