शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्याला विकासाच्या प्रवाहात आणणार -  अजित पवार  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 16:56 IST

जिल्ह्याला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मानव विकास निर्देशांक कमी असल्याने वाशिम जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्यात पायाभूत सुविधांची निर्मिती करून दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी केल्या जाणाºया प्रयत्नांना राज्य शासनाकडून सहकार्य केले जाईल. जिल्ह्याला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी केले.जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) २०२०-२१ च्या प्रारूप आराखड्याला अंतिम मंजुरी देण्यासाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनमध्ये आज, २८ जानेवारी रोजी झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत ते बोलत होते. यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री बच्चू कडू, वाशिम जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार अमित झनक, नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, विभागीय आयुक्त पियुष सिंह, जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक लीना बन्सोड, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ यांच्यासह विविध कार्यान्वयीन यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.जिल्हाधिकारी मोडक यांनी प्रारूप आराखड्याविषयी सादरीकरण केले. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, सन २०१९-२० मध्ये जिल्हा वार्षिक योजनेतून सुरु असलेली सर्व विकास कामे चांगल्या दर्जाची होणे आवश्यक आहे. ही कामे  विहित कालवधीत पूर्ण करावीत. विकास करण्यात आलेला निधी विहित मुदतीत पूर्णपणे खर्च होईल, याची दक्षता घ्यावी. जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने एकत्रितपणे प्रयत्न करावेत.सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन २०२०-२१ करिता जिल्ह्याला १०५ कोटी रुपये नियतव्यय व आकांक्षित जिल्हा म्हणून २५ टक्के अतिरिक्त नियतव्यय  निश्चित करण्यात आला होता. मात्र कार्यान्वयीन यंत्रणांची मागणी आणि जिल्ह्यातील विकासकामांची गरज लक्षात घेवून जिल्ह्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या एकूण नियतव्ययाची मर्यादा १६३ कोटी रुपये इतकी निश्चित करण्यास यावेळी मंजुरी देण्यात आली. वाढीव निधीतून प्राधान्याने ग्रामीण भागातील सुविधा निर्मितीची कामे पूर्ण करावीत. तसेच पोलीस दलाला अद्ययावत वाहने देणे, भारतीय जैन संघटनेच्या सहभागातून जलसंधारण व पांदन रस्त्यांची कामे करण्यासाठी इंधन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी दिल्या.

टॅग्स :washimवाशिमAjit Pawarअजित पवार