शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
6
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
7
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
8
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
9
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
10
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
11
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
12
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
13
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
14
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
15
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
16
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
17
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
18
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
19
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
20
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला

वाशिम जिल्ह्यातील ‘ते’ दोन पोलिस कर्मचारी सेवेतून बडतर्फ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 16:18 IST

वाशिम : अत्यल्प रकमेत ३.५ किलो सोने देतो, अशी बतावणी करून पुण्याच्या इसमाला उमरखेड (जि.यवतमाळ) येथे बोलावून १२ लाखांनी लुटल्याच्या घटनेत सहभागी वाशिम जिल्ह्यातील दोन्ही पोलिस कर्मचाºयांना पोलिस सेवेतून तडकाफडकी बडतर्फ करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : अत्यल्प रकमेत ३.५ किलो सोने देतो, अशी बतावणी करून पुण्याच्या इसमाला उमरखेड (जि.यवतमाळ) येथे बोलावून १२ लाखांनी लुटल्याच्या घटनेत सहभागी वाशिम जिल्ह्यातील दोन्ही पोलिस कर्मचाºयांना पोलिस सेवेतून तडकाफडकी बडतर्फ करण्यात आले. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेसी यांनी शिरूर, जि. पुणे येथील रणजीत पांडूरंग गायकवाड यांना कमी किंमतीत ३.५ किलो सोने देण्याची बतावणी करून गायकवाड यांना सोने न देता उलटपक्षी धमकावून त्यांच्याजवळचे १२ लाख रुपये पोबारा केला. मुकेश श्रीराम गौरखेडे (३५) आणि कैलास मंगूसिंग राठोड (४०) अशी या घटनेतील आरोपी पोलिसांची नावे असून गौरखेडे हा मंगरुळपीर पोलीस ठाण्यात, तर राठोड हा कारंजा पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होता. या दोघांशिवाय रवी श्यामराव कानडे (२३, रा. मथनी, ता. मानोरा) याला पोलिसांनी १८ मार्च रोजी ताब्यात घेतले होते. १९ मार्च रोजी अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींना उमरखेड (जि.यवतमाळ) येथील न्यायालयात हजर केले असता, त्यांना न्यायालयाने २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, या घटनेची गंभीर दखल घेत वाशिमचे जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांनी पोलिस दलातील दोन्ही आरोपी कर्मचाºयांना तडकाफडकी सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवा राठोड यांनी कळविली.

टॅग्स :washimवाशिमPoliceपोलिसsuspensionनिलंबन