शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील जि.प. शिक्षकांचे वेतन रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 17:55 IST

वाशिम: जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत साडेतीन हजारांवर शिक्षकांचे जुलै महिन्याचे वेतन अद्यापही अदा झालेले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत साडेतीन हजारांवर शिक्षकांचे जुलै महिन्याचे वेतन अद्यापही अदा झालेले नाही. जि.प. स्तरावर वार्षिक वेतनवाढ जोडण्याची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने शिक्षकांचे वेतन प्रलंबित असून, यामुळे शिक्षकांना मात्र अडचणींचा सामना करावा लागत आहे.जिल्ह्यात जिल्हा परिषदे अंतर्गत ७७९ शाळा असून, या शाळांवर साडे तीन हजारांवर शिक्षक कार्यरत आहेत. शिक्षकांना दर महिन्याच्या पहिल्या तारखेला वेतन अदा करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्याबाबत जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून प्रयत्नही करण्यात येतात; परंतु बरेचदा शिक्षकांचे वेतन महिन्याच्या पहिल्या तारखेला होत नाही. त्यामुळे शिक्षकांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यात बँक, पतसंस्थेकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते प्रलंबित राहतात. घरच्या आर्थिक अडचणी उद्भवतात. जुलै आॅगस्ट महिन्यातही अशीच स्थिती त्यांच्यावर ओढवली आहे. आॅगस्ट महिन्याची पाच तारिख उलटली तरी, शिक्षकांचे वेतन झालेले नाही. त्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, या संदर्भात जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून माहिती घेतली असता शासनाने जुलै महिन्याचे वेतन आॅनलाईन पद्धतीने करण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने आॅनलाईन पद्धतीने वेतन करण्याची तयारी करून सर्व प्रक्रियाही पूर्ण केली; परंतु केवळ दोन महिन्यांचे वेतन आॅनलाईन पद्धतीने करणे योग्य ठरणार नसल्याने शासनाकडून पुन्हा शिक्षकांचे वेतन आॅफलाईन  पद्धतीने करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यामुळे शिक्षण विभागाला पुन्हा आॅफलाईन पद्धतीने वेतन करण्याची तयारी करावी लागली. यामुळे वेतनाची देयके तयार करण्यास विलंब झाला आणि शिक्षकांचे वेतन रखडले, असे कळले. पंचायत समित्यांची वेतन देयके तयारमहिन्याच्या १ तारखेला शिक्षकांचे वेतन अदा करण्याचे कडक निर्देश असल्याने तालुकास्तरावर पंचायत समित्यांनी आपापल्या परिने तयारी करून शिक्षकांच्या वेतनाची देयके तयारही केली आणि शिक्षकांच्या वेतनासाठी निधीची मागणीही नोंदविली; परंतु वरिष्ठस्तरावर प्रक्रियाच पूर्ण झाली नसल्याने कोषागाराकडे वेतनाची देयकेच पोहोचू शकली नाहीत. त्यातच जुलै महिन्यात वेतनवाढ जोडावी लागत असल्यानेही अंतिम देयके सादर करण्यास विलंब झाला. त्याचा फटका मात्र शिक्षकांना बसला आहे.

शासनाने जुलै महिन्याचे वेतन आॅनलाईन पद्धतीने करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्याची तयारी केली असतानाच जुलै महिन्याचे वेतन आॅफलाईन पद्धतीने करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे नव्याने आॅफलाईन देयकाची तयारी करावी लागली. यामुळेच शिक्षकांचे वेतन वेळेवर करता आले नाही.-अंबादास मानकरशिक्षणाधिकारी (प्राथमिक)जि.प. वाशिम

टॅग्स :washimवाशिमTeacherशिक्षकWashim ZPवाशीम जिल्हा परिषद