शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : ‘अनलॉक-४’ च्या प्रक्रियेकडे जिल्हावासियांचे लक्ष !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 11:30 IST

‘अनलॉक-४’च्या टप्प्यात जिल्ह्यात नेमके काय खुले राहणार आणि कशावर निर्बंध कायम राहणार, याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागून आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात ३१ आॅगस्टपर्यंत लॉकडाऊन आहे. १ सप्टेंबरपासून ‘अनलॉक-४’च्या टप्प्यात जिल्ह्यात नेमके काय खुले राहणार आणि कशावर निर्बंध कायम राहणार, याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागून आहे. ‘अनलॉक-४’संदर्भात केंद्र शासनाच्या सूचना प्राप्त झाल्या असून, अद्याप राज्य शासनाच्या सूचना प्राप्त झाल्या नाहीत, असे जिल्हा प्रशासनाने रविवारी सायंकाळी स्पष्ट केले.कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात २४ मार्चपासून लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेला जबर फटका बसल्याने लॉकडाऊनमध्ये हळूहळू शिथिलता आणली जात आहे. जिल्ह्यात सध्या ३१ आॅगस्टपर्यंत लॉकडाऊन असून, सर्व दुकाने, आस्थापना हे सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतच्या कालावधीत सुरु ठेवण्यास मुभा आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, दुसरीकडे लॉकडाऊनमुळे अर्थचक्रही प्रभावित होत आहे. त्यामुळे १ सप्टेंबरपासून दुकाने सुरू ठेवण्याच्या वेळेत वाढ होण्याचे संकेत आहे. ‘अनलॉक-४’ संदर्भात केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत. परंतू, अद्याप राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या नाहीत. राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार जिल्ह्यात ‘अनलॉक-४’च्या टप्प्याची अंमलबजावणी होणार असल्याने तुर्तास जिल्हा प्रशासनासह नागरिकांना राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची प्रतीक्षा आहे.

३१ आॅगस्टपर्यंत यावर आहेत निर्बंधसर्व शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, कोचिंग क्लासेस इत्यादी ३१ आॅगस्टपर्यंत बदं आहेत. हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि इतर आतिथ्य सेवा, सिनेमागृह, जिम्नॅशियम, जलतरण तलावदेखील बंदच आहेत. सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व सर्व प्रकारच्या मेळाव्यांवर बंदी आहे. सर्व धार्मिकस्थळे, प्रार्थनास्थळे सामान्य व्यक्तींसाठी बंद असून, कोणत्याही परिस्थितीत धार्मिक सभा, धार्मिक परिषद, धार्मिक मेळावे ३१ आॅगस्टपर्यंत भरविता येणार नाहीत.‘अनलॉक-४’संदर्भात केंद्र शासनाच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. मात्र, राज्य शासनाच्या सूचना रविवारी सायंकाळी उशिरापर्यंत प्राप्त होण्याची दाट शक्यता आहे. त्यानुसार जिल्ह्यात अनलॉक-४’च्या टप्प्याची अंमलबजावणी केली जाईल.- शैलेश हिंगे,निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक