शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात  दोन वर्षात पूर्ण झाले केवळ ७५२ शेततळे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 14:12 IST

वाशिम: ९ फेब्रुवारी २०१६ रोजी झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेस मंजुरात मिळाली. याअंतर्गत वाशिम जिल्ह्याच्या वाट्याला १९०० शेततळ्यांचे उद्दीष्ट आले होते. मात्र, गेल्या दोन वर्षांत त्यापैकी ७५२ शेततळेच पूर्ण झाले उर्वरित ११४८ शेततळे वाटपाकरिता कृषी विभागाची चांगलीच दमछाक होत आहे.

ठळक मुद्दे वाशिम जिल्ह्याच्या वाट्याला १९०० शेततळ्यांचे उद्दीष्ट आले होते.शेततळ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित लाभार्थ्याच्या खात्यात रक्कम जमा केली जाते. उर्वरित ११४८ शेततळे वाटपाकरिता कृषी विभागाची चांगलीच दमछाक होत आहे.

वाशिम: ९ फेब्रुवारी २०१६ रोजी झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेस मंजुरात मिळाली. याअंतर्गत वाशिम जिल्ह्याच्या वाट्याला १९०० शेततळ्यांचे उद्दीष्ट आले होते. मात्र, गेल्या दोन वर्षांत त्यापैकी ७५२ शेततळेच पूर्ण झाले उर्वरित ११४८ शेततळे वाटपाकरिता कृषी विभागाची चांगलीच दमछाक होत आहे. दरम्यान, इच्छुक शेतकºयांनी ‘आॅनलाईन’ अर्ज सादर करून योजनेत सहभागी होण्याचे आवाहन पुन्हा एकवेळ गुरूवारी करण्यात आले आहे. शेतमाल उत्पादनात शाश्वतता आणण्यासाठी तसेच दुष्काळावर मात करण्यासाठी शेततळे उपयुक्त असल्याने राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धनाच्या माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे तसेच संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी  शासनाने पुर्वी राबविण्यात येत असलेल्या सर्व योजनांची मोडतोड करून ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना अंमलात आणली. मात्र, या योजनेत सहभागी होण्यासाठी किचकट अटी व शर्ती टाकण्यात आल्या आहेत. त्यानुसार, टंचाईग्रस्त भागातील ज्या गावात मागील ५ वर्षात किमान एक वर्ष तरी ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी जाहिर करण्यात आली, अशा गावांमध्ये शेततळे घेण्यास मान्यता देण्यात आली. योजनेअंतर्गत सात प्रकारच्या आकारमानाची शेततळी निश्चित करण्यात आली असून सर्वात मोठ्या आकारमानाचे शेततळे ३० बाय ३० बाय ३ मीटरचे असून त्यासाठी केवळ ५० हजार रुपये कमाल अनुदान दिले जात आहे. शेततळ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित लाभार्थ्याच्या खात्यात रक्कम जमा केली जाते. एकूणच या सर्व अटींमुळे शेतकºयांकडून मागेल त्याला शेततळे योजनेस प्रतिसाद मिळणे अशक्य ठरत आहे. पर्यायाने दोन वर्षांपूर्वी देण्यात आलेले १९०० शेततळ्यांचे उद्दीष्ट अद्याप पूर्ण झालेले नाही.

‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेतून ज्या शेतकºयांना शेततळे घेण्याची इच्छा आहे, त्यांना आॅनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुक शेतकºयांनी या योजनेचा लाभ घ्यावा. काही अडचण आल्यास कृषी सहायक, मंडळ अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.- दत्तात्रय गावसानेजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी