शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
2
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
3
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
4
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
5
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
6
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
7
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
8
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
9
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
10
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
11
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
12
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
13
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
14
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
15
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
16
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
17
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
18
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
20
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका

वाशिम जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाच्या स्थळात पुन्हा बदल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 3:42 PM

वाशिम : कार्यक्रमाच्या स्थळात बदल करून आता काटा-कोंडाळा चौकात बुधवार, २१ फेब्रूवारीला हा महोत्सव आयोजित करण्यात आल्याची माहिती ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक डॉ. डी.एल. जाधव यांनी सोमवारी दिली.

ठळक मुद्देजिल्हास्तरीय कृषी महोत्सव डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाच्या प्रक्षेत्रावर होत असल्याचे ‘आत्मा’ने १० दिवसांपूर्वी कळविले होते. आता काटा-कोंडाळा चौक येथे हा महोत्सव होत आहे. महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर यांच्या हस्ते होणार आहे.

वाशिम : जिल्हास्तरीय कृषी महोत्सव डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाच्या प्रक्षेत्रावर होत असल्याचे ‘आत्मा’ने १० दिवसांपूर्वी कळविले होते. मात्र, त्याठिकाणी हा महोत्सव घेण्यास परवानगी न मिळाल्याने कार्यक्रमाच्या स्थळात बदल करून आता काटा-कोंडाळा चौकात बुधवार, २१ फेब्रूवारीला हा महोत्सव आयोजित करण्यात आल्याची माहिती ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक डॉ. डी.एल. जाधव यांनी सोमवारी दिली.आधी वाशिम शहरातील जिल्हा क्रीडांगण, नंतर मालेगाव रोडवरील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाचे प्रक्षेत्र आणि आता काटा-कोंडाळा चौक येथे हा महोत्सव होत आहे. वास्तविक पाहता हा उपक्रम शेतकºयांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असण्यासोबतच शासकीय कार्यक्रम असल्याने स्थळ निश्चिती अथवा इतर तत्सम नियोजन चोख असणे क्रमप्राप्त आहे. मात्र, असे न झाल्याने जिल्ह्यातील शेतकरी संभ्रमात सापडले आहेत. दरम्यान, आता स्थळ अंतीम झाले असून महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाचे पालकमंत्री संजय राठोड राहतील. ऊर्जा, पर्यटन राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे सह पालकमंत्री मदन येरावार, नगरविकास, गृह (शहरे) राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, कृषी व फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, खासदार भावना गवळी, खासदार संजय धोत्रे, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार श्रीकांत देशपांडे, आमदार लखन मलिक, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, नगराध्यक्ष अशोक हेडा, जिल्हा परिषद कृषी सभापती विश्वनाथ सानप, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा, विभागीय कृषि सहसंचालक एस. के. नागरे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहणार आहे. वाशिम येथील जिल्हा क्रीडांगणावर क्रीडा स्पर्धा होत असल्याने हे स्थळ महोत्सवाकरिता उपलब्ध होऊ शकले नाही. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विज्ञापिठाच्या प्रक्षेत्रावर महोत्सव आयोजित करता येणार नाही, असे कळविण्यात आल्यानेच अखेर काटा-कोंडाळा चौक येथे महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.  - - डॉ.डी.एल.जाधव, प्रकल्प संचालक, ‘आत्मा’, वाशिम

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती