शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्हा; अर्धा डिसेंबर संपल्यानंतरही नोव्हेंबरची वीज देयके अद्याप अप्राप्तच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 14:23 IST

वाशिम: महावितरण कडून घेतल्या जाणाºया ‘रिडिंग’नुसार आकारले जाणारे विद्यूत देयक महिण्याच्या १० तारखेपर्यंत सर्व ग्राहकांच्या हाती पडते. मात्र, चालू महिण्यात १५ तारीख उलटूनही नोव्हेंबर महिण्याच्या वीज वापराची देयके अनेक ग्राहकांना मिळालेली नाही. जुन्या एजन्सी बदलून नव्या एजन्सीकडे हे काम दिल्यामुळेच ही समस्या उद्भवल्याची माहिती सूत्रांनी शुक्रवारी दिली.जिल्ह्यात महावितरणचे १ लाख ...

ठळक मुद्देचालू महिण्यात १५ तारीख उलटूनही नोव्हेंबर महिण्याच्या वीज वापराची देयके अनेक ग्राहकांना मिळालेली नाही.पुर्वीच्या एजन्सीकडील काम काढून घेत नव्या एजन्सी नियुक्त करण्यात आल्या आहेत. नव्या एजन्सीमधील कामगारांना अनेक ग्राहकांची घरे माहित नसल्याने देयक वाटप करण्यास विलंब लागत आहे.

वाशिम: महावितरणकडून घेतल्या जाणाºया ‘रिडिंग’नुसार आकारले जाणारे विद्यूत देयक महिण्याच्या १० तारखेपर्यंत सर्व ग्राहकांच्या हाती पडते. मात्र, चालू महिण्यात १५ तारीख उलटूनही नोव्हेंबर महिण्याच्या वीज वापराची देयके अनेक ग्राहकांना मिळालेली नाही. जुन्या एजन्सी बदलून नव्या एजन्सीकडे हे काम दिल्यामुळेच ही समस्या उद्भवल्याची माहिती सूत्रांनी शुक्रवारी दिली.

जिल्ह्यात महावितरणचे १ लाख ५२ हजार ८८६ घरगुती वीज वापर करणारे ग्राहक आहेत. या सर्व ग्राहकांचे ‘मीटर रिडींग’ घेतल्यानंतर प्रत्येक महिन्याच्या २ किंवा ३ तारखेपर्यंत देयके तयार होतात. ती १० तारखेपर्यंत वाटप झाल्यास ग्राहकांना मुदतीच्या आत देयक अदा करणे सोपे होते. यामुळे विलंब आकारही लागत नाही. चालू महिण्यात मात्र महावितरणकडूनच देयके वाटप करण्यास उशिर झाला असून संपूर्ण ग्राहकांना देयक वाटप करण्यास आणखी ४ ते ५ दिवस लागणार आहेत. त्यामुळे देयक उशिरा अदा केल्यानंतर लागणारा विलंब आकार कुणी भरायचा, असा सवाल सद्या उपस्थित होत आहे. महावितरणने ही बाब गांभीर्याने घेवून लवकरात लवकर देयकांचे वाटप करावे, अशी मागणी होत आहे. 

कामात सुधारणा करण्याच्या दृष्टीने ‘मीटर रिडींग’ घेणाºया आणि देयकांचे वितरण करणाºया यापुर्वीच्या एजन्सीकडील काम काढून घेत नव्या एजन्सी नियुक्त करण्यात आल्या आहेत. यामुळे ‘रिडींग’ चोख घेतल्या गेले; परंतु नव्या एजन्सीमधील कामगारांना अनेक ग्राहकांची घरे माहित नसल्याने देयक वाटप करण्यास विलंब लागत आहे. तथापि, मुदतीनंतर देयक हाती पडल्यास ग्राहकांनी तशी माहिती महावितरणला कळवावी. संबंधितांना निश्चितपणे विलंब आकार लागणार नाही.

- व्ही.बी.बेथारिया, अधीक्षक अभियंता, महावितरणचालू महिण्यात १५ तारीख उलटूनही नोव्हेंबर महिण्याच्या वीज वापराची देयके अनेक ग्राहकांना मिळालेली नाही.

 

टॅग्स :washimवाशिमmahavitaranमहावितरण