शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्हा : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची प्रतिक्षा कायम! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 19:21 IST

वाशिम: जिल्ह्यात विविध महाविद्यालयात उच्च शिक्षण घेणाºया शेकडो विद्यार्थ्यांची मागील वर्षीची अर्थात सन २०१६-१७ या वर्षाची शिष्यवृत्ती अद्यापही त्यांना मिळाली नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यात अनेक अडचणी येत आहेत. 

ठळक मुद्देअनुसूचित जाती वर्गातील विद्यार्थी अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात विविध महाविद्यालयात उच्च शिक्षण घेणाºया शेकडो विद्यार्थ्यांची मागील वर्षीची अर्थात सन २०१६-१७ या वर्षाची शिष्यवृत्ती अद्यापही त्यांना मिळाली नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यात अनेक अडचणी येत आहेत. शासनाच्या विविध योजनेंतर्गत महाविद्यालयीन शिक्षण घेणाºया अनुसूचित जाती, जमाती, इतर मागास प्रवर्ग व भटक्या जमातीमधील विद्यार्थ्यांना समाज कल्याण विभागामार्फत दरमहा शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. साधारणपणे वर्षभराची शिष्यवृत्ती एकदाच विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होत असते. मागील सत्रातील सन २०१६-१७ ची शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मार्च २०१७ पर्यंत मिळणे अपेक्षीत होते; परंतु यंदाचे सत्र अर्ध्याहून अधिक संपले असतानाही अद्याप गतवर्षीची शिष्यवृत्तीच अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मिळालेली नाही. प्रामुख्याने पदवीचे शिक्षण घेणाºया विविध शाखातील विद्यार्थ्यांसह ११ वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रलंबित आहे. जवळपास दीड हजार विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. दरम्यान, या संदर्भात वाशिम येथील समाज कल्याण विभागाच्या अधिकाºयांशी संपर्क साधला असता शासनाकडून मिळालेल्या निधीनुसार विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्ती जमा करण्याची प्रक्रिया सुरू असून, येत्या काही दिवसांत निधी प्राप्त झाल्यानंतर सर्वच विद्यार्थ्यांच्या खात्यात त्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती जमा करण्यात येणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.  

टॅग्स :washimवाशिमcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी