शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : संचारबंदीचे उल्लंघन; हजारावर नागरिकांविरूद्ध गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 10:56 IST

एक हजार नागरिकांविरूद्ध गुन्हे दाखल केले असून, ४५० च्या आसपास दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : देशभरासह संपूर्ण राज्यात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणू संसर्गापासून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात संचारबंदी व लॉकडाऊन आहे. गत १५ दिवसात संचारबंदीचे उल्लंघन करणाºया जवळपास एक हजार नागरिकांविरूद्ध गुन्हे दाखल केले असून, ४५० च्या आसपास दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. तुर्तास जिल्ह्यात कोरोनाबाधित एकही रुग्ण नाही. जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी, या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी व जिल्हा बंदी आदेशाची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनी शक्यतोवर घराबाहेर पडू नये, अत्यावश्यक काम असेल तरच एकट्याने घराबाहेर पडावे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, कुठेही गर्दी करू नये, अशा सूचना जिल्हा प्रशासनासह पोलीस प्रशासनाने वारंवार दिलेल्या आहेत. या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांविरूद्ध कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासनाने गत १५ दिवसांपासून मोहिम उघडली आहे. विनाकारण चकरा मारणे, संचारबंदीचे उल्लंघन करणे याप्रकरणी आतापर्यंत जिल्ह्यातील जवळपास एक हजारावर नागरिकांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी दिली.अनेक नागरिक हे शहरासह ग्रामीण भागात कोणतेही अत्यावश्यक काम नसतानाही दुचाकीवरून फिरतात. अशा नागरिकांची पोलीस कर्मचाºयांमार्फत चौकशी करून योग्य कारण निदर्शनात आले नाही तर दुचाकी जप्त केली जात आहे. आतापर्यंत ४५० च्या आसपास दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी संचारबंदी आदेशाचे पालन करून जिल्ह्यात कुठेही गर्दीे होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले. संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करणाºयांची गय केली जाणार नाही, असे पोलीस अधीक्षक परदेशी यांनी स्पष्ट केले.

कोरोना विषाणू संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनी स्वत:हून संचारबंदी आदेशाचे पालन करणे अपेक्षीत आहे. अत्यावश्यक कामाशिवाय कुणी घराबाहेर पडत असल्याचे निदर्शनात आल्यानंतर गुन्हे दाखल केले जात आहेत.आतापर्यंत एक हजार नागरिकांविरूद्ध गु्न्हे दाखल केले. - वसंत परदेशी, पोलीस अर्धीक्षक, वाशिम

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्याtraffic policeवाहतूक पोलीस