शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम: दिग्रस ते मानोरा रस्त्यावर चक्का जाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 02:35 IST

मानोरा : तालुक्याला गुलाबी बोंडअळीच्या अनुदानातून वगळल्यामुळे शिवसेना पक्षाच्यावतीने ५ मार्च रोजी दुपारी १ वाजता माजी आमदार प्रकाश डहाके यांच्या नेतृत्वात दिग्रस चौकात रस्ता रोको आंदोलन करून शासनाला शेतक-यांच्या स्वाक्षरीचे निवेदन तहसीलदार यांच्या माध्यमातून देण्यात आले.

ठळक मुद्देशेतक-यांसाठी डहाके रस्त्यावर

 लोकमत न्युज नेटवर्कमानोरा : तालुक्याला गुलाबी बोंडअळीच्या अनुदानातून वगळल्यामुळे शिवसेना पक्षाच्यावतीने ५ मार्च रोजी दुपारी १ वाजता माजी आमदार प्रकाश डहाके यांच्या नेतृत्वात दिग्रस चौकात रस्ता रोको आंदोलन करून शासनाला शेतक-यांच्या स्वाक्षरीचे निवेदन तहसीलदार यांच्या माध्यमातून देण्यात आले. २०१७ च्या खरीप हंगामात कपाशी पिकावर गुलाबी बोंडअळीने आक्रमण करून पिकाचे नुकसान केले. यामुळे  महसूल प्रशासनाने सर्वेक्षण करून शासनाकडे अहवाल पाठविला. शासनाने मदत जाहीर केली. शेतकरी बांधवांना मदत मिळेल या आशेवर असताना शासनाने गेल्या पाच वर्षांचा शेतकºयांचा नुकसान भरपाईची सरासरी काढून ज्या शेतकºयाचे सरासरी ३३ टक्के नुकसान झाले, अशा शेतकºयांनाच गुलाबी बोंडअळीचे नुकसान मिळणार, असा जी.आर. शासनाने २८ फेबु्रवारी रोजी काढला. या शासनाच्या या दुटप्पी धोरणाचा निषेध करण्यासाठी व जाचक अटीचा जी.आर परत घेऊन शेतकºयानां तत्काळ आर्थिक मदत देण्यात यावी, यासाठी हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी जि.प. सदस्य गजानन अमदाबादकर, उष्मान गारवे, सहकार नेते सुरेश गावंडे, रवी पवार, प्रकाश डहाके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यावेळी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर माजी आ.प्रकाश डहाके, जि.प. सदस्य  गजानन अमदाबादकर, उश्मान गारवे, सहकार नेते सुरेश गावंडे, माजी सभापती अशोक देशमुख,  शिवसेना ता.प्र. रवी पवार, शहर प्रमुख राजू देशमुख,  बाजार समितीचे  संचालक राजेश नेमाणे,  राम राठोड, राजू पाटील, विकास चौधरी, मोतीराम ठाकरे, डॉ. रामराव राठोड, वीरू राठोड, विनोद अप्पाघाटरे,  डॉ.दीपक पाटील, भगवान देशमुख, मन्साराम  राठोड, माजी जि.प. सदस्य भाऊ नाईक, सुदाम पवार, चंद्रकांत राठोडसह  शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सुमारे १ तास वाहतूक सेवा ठप्प झाली होती. ठाणेदार रामकृष्ण मळघने यांनी यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

टॅग्स :washimवाशिम