शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : लाच मागितल्याप्रकरणी गोवर्धन येथील सरपंचाविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 01:13 IST

वाशिम : मंजूर असलेल्या घरकुलाचे यादीतील नाव कमी न करण्यासाठी २५00  रुपये लाचेची मागणी करणार्‍या गोवर्धन (ता. रिसोड जि. वाशिम) ग्राम पंचायतच्या सरपंच नंदाबाई बबन शेळके यांच्याविरुद्ध शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल  केला, अशी माहिती एसीबीचे पोलीस उपअधीक्षक आर.व्ही. गांगुर्डे यांनी दिली. 

ठळक मुद्देघरकुल यादीतून नाव कमी करण्यासाठी मागितली लाच

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मंजूर असलेल्या घरकुलाचे यादीतील नाव कमी न करण्यासाठी २५00  रुपये लाचेची मागणी करणार्‍या गोवर्धन (ता. रिसोड जि. वाशिम) ग्राम पंचायतच्या सरपंच नंदाबाई बबन शेळके यांच्याविरुद्ध शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल  केला, अशी माहिती एसीबीचे पोलीस उपअधीक्षक आर.व्ही. गांगुर्डे यांनी दिली. गोवर्धन येथील सरपंच नंदाबाई शेळके या आहेत. त्यांचा मुलगा अंबादास हा सरपंच पदाची सर्व कामे पाहतो. सन २0१७ मध्ये गोवर्धन येथे तक्रारदारासह ६६ लोकांना घरकुल मंजूर झाले आहे. ४ जानेवारी २0१८ रोजी तक्रारदार व सरपंच नंदाबाई शेळके व त्यांचा मुलगा अंबादास यांची भेट झाली. तेव्हा अंबादास तक्रारदारास म्हणाला की, घरकुलाचे तुम्हाला ३,५00 रुपये द्यावे लागतील. नाहीतर तुमचे नाव घरकुलाचे यादीतून काढून टाकतो. म्हणून तक्रारदाराने सरपंच नंदाबाई व अंबादास यास पैसे देण्याचे कबूल केले. तक्रारदार यांनी पूर्वीच अंबादास यांना १ हजार रुपये दिले. उर्वरित २५00 रुपये सात दिवसांचे आत अंबादासने देण्यास सांगितले. अशा तक्रारीवरून ६ जानेवारीला पडताळणी केली असता, सरपंच नंदाबाई शेळके यांची लाच निष्पन्न झाली; परंतु लाच रक्कम किती व केव्हा द्यावयाची, हे सरपंच नंदाबाईचा मुलगा अंबादास शेळके हा ठरविणार असल्याने व अंबादास हा गावात हजर नसल्याने त्याची नंतर पडताळणी करण्याचे ठरले. तक्रारदाराने २४ जानेवारी रोजी सांगितले की, सरपंच शेळके व त्यांचा मुलगा अंबादास यांना संशय आल्याने ते पैशाची मागणी करणार नाहीत, तसेच लाचेची रक्कम स्वीकारणार नाहीत, असे जबाबात सांगितल्याने सरपंच नंदाबाई शेळके यांना लाच मागणी प्रकरणात ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस उप-अधीक्षक आर.व्ही. गांगुर्डे यांनी दिली. या कार्यवाही पथकामध्ये पोलीस निरीक्षक एन.बी. बोर्‍हाडे, गोकुळ पाटील, प्रमोद पाटील, भगवान गावंडे, नंदकिशोर परळकर, दिलीप बेलोकार, संतोष कंकाळ, निमिन टवलारकर, विनोद सुर्वे, अरविंद राठोड, सुनील मुंदे, विनोद अवगळे, रामकृष्ण इंगळे यांचा समावेश होता.  

टॅग्स :washimवाशिमCrimeगुन्हा