शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम बसस्थानकातील फलाटच बनले वाहनतळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 16:42 IST

वाशिम: बसस्थानकापासून १०० मीटर अंतराच्या आत वाहनतळाशिवाय इतर ठिकाणी वाहनास प्रवेशच निषिद्ध आहे; परंतु वाशिम येथील बसस्थानकात मात्र या आचारसंहितेचे उल्लंघन करून थेट बसस्थानक इमारतीत फलाटापर्यंत काही महाभाग आपल्या दुचाकी सुरक्षीतपणे उभ्या ठेवत असल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्देबसस्थानक परिसरात १०० मीटर अंतरापर्यंत राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) वाहनाशिवाय इतर कुठलेही वाहन उभे ठेवण्याची परवानगी नाही. वाशिम येथील  बसस्थानक इमारतीच्या दोन्ही बाजुला अगदी फलाटापर्यंत अनेक दुचाकी उभ्या ठेवण्यात आल्याचे दिसून येते. या प्रकाराकडे आगार आणि बसस्थानक प्रमुखांचे पूर्णपणे दुर्लक्ष असल्यानेच दुचाकीधारक आपली दुचाकी येथे कित्येक तास उभी ठेवतात.

वाशिम: बसस्थानकापासून १०० मीटर अंतराच्या आत वाहनतळाशिवाय इतर ठिकाणी वाहनास प्रवेशच निषिद्ध आहे; परंतु वाशिम येथील बसस्थानकात मात्र या आचारसंहितेचे उल्लंघन करून थेट बसस्थानक इमारतीत फलाटापर्यंत काही महाभाग आपल्या दुचाकी सुरक्षीतपणे उभ्या ठेवत असल्याचे दिसत आहे. या प्रकाराकडे वाशिमच्या आगार प्रमुखांचे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे. बसस्थानकावरील वाहनतळ सोडून कुठल्याही बसस्थानक परिसरात १०० मीटर अंतरापर्यंत राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) वाहनाशिवाय इतर कुठलेही वाहन उभे ठेवण्याची परवानगी नाही. ते नियमांचे उल्लंघन असल्याने बसस्थानक प्रमुखच परिसरात उभ्या केलेल्या वाहनांवर कारवाईसुद्धा करू शकतात. तथापि, वाशिम येथील बसस्थानकावर मात्र याची दखल घेतल्या जात नसल्याचे दिसत आहे. वाशिम येथील  बसस्थानक इमारतीच्या दोन्ही बाजुला अगदी फलाटापर्यंत अनेक दुचाकी उभ्या ठेवण्यात आल्याचे दिसून येते. इमारतीच्या प्रवेशद्वारापासून अगदी फलाटापर्यंत वाहने उभी करण्यात येत असल्याने वाहने सुरक्षीत राहतात; परंतु प्रवाशांना मात्र बसस्थानकात प्रवेश करतानाही अडचण येते. या प्रकाराकडे आगार आणि बसस्थानक प्रमुखांचे पूर्णपणे दुर्लक्ष असल्यानेच दुचाकीधारक आपली दुचाकी येथे कित्येक तास उभी ठेवतात. प्रत्यक्षात वाशिम येथील बसस्थानकावर वाहनतळ असून, येथे दुचाकी उभ्या ठेवण्याची व्यवस्थाही आहे; परंतु त्याची दखल घेण्यात येत नसल्याचे दिसते. 

बसस्थानक इमारतीच्या छताखाली दुचाकी उभ्या ठेवण्यास परवानगी नाही. एखादवेळी हा प्रकार घडला असेल. तथापि, प्रवाशांना होत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन इमारतीच्या आत प्रवेश करणाºया वाहनांसह परिसरात ठेवल्या खाजगी वाहनांवर नियमानुसार तातडीने कार्यवाही करण्यात येईल.-व्ही. एम. इलमे, आगार व्यवस्थापक, वाशिम

टॅग्स :washimवाशिमstate transportराज्य परीवहन महामंडळ